मराठी मालिकाविश्वासह सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून प्रिया मराठे आणि शंतनू मोघे यांना ओळखले जाते. हे दोघेही मालिकांमुळे घराघरात पोहोचले. प्रिया मराठे आणि शंतनू मोघे यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. आता प्रिया मराठे आणि शंतनू मोघेच्या एका व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रिया मराठे ही सोशल मीडियावर सक्रीय असते. आता प्रियाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्रिया ही किचनमध्ये काम करताना दिसत आहे. तर शंतनू हा तिला एक एक काम सांगताना दिसत आहे. या दोघांच्या संवादाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


या व्हिडीओत शंतनू हा प्रियाला 'माझी कॉफी झाली का?' असा प्रश्न विचारतो. त्यावर प्रिया करतेय, असं म्हणते. यावर शंतून हा 'घाईच्या वेळेला पटकन करत जा ना गं', असे म्हणतो. त्यावर प्रिया मग 'तू लवकर उठत जा ना', असे म्हणतो. यानंतर शंतनू हा ओरडत 'चार्जर कुठेय' असे विचारतो. त्यावर प्रिया 'कुठे असतो', असे म्हणते. त्यानंतर शंतनू 'तू जीममध्ये काल माझे इअरपॉड्स का घालून गेली होतीस', असे विचारतो. त्यावर प्रिया चिडत 'शंतनू प्लीझ' असे म्हणत ओट्यावर हात आपटते. 


यानंतर शंतनू 'आजचा पेपर, आजचा पेपर' असे म्हणतो. त्यावर ती 'आईच्या रुममध्ये बघ' असे सांगते. त्यानंतर शंतनू हा तिला मिळाल्याचे सांगतो आणि बाथरुममध्ये जाऊन बसतो. यानंतर तो मोबाईल चार्जिंगला लावतो. एक्झॉस्ट फॅन सुरु करतो आणि रुम फ्रेशनरचाही वापर करतो. यानंतर तो कॉफी पिताना न्यूजपेपर वाचताना दिसत आहे. प्रिया मराठेने या व्हिडीओला 'सकाळचे विधी' असे कॅप्शन दिले आहे. त्यासोबतच तिने कपल रिल्स, कपल थिंग्स असे हॅशटॅगही दिले आहेत.  



दरम्यान सध्या प्रिया मराठे ही कोण म्हणतं टक्का दिला? या नाटकात झळकत आहे. या नाटकाची निर्मिती नवनित प्रॉडक्शनने केली आहे. तर याचे दिग्दर्शन सुबोध पंडे यांनी केले आहे. या नाटकाचे लेखन संजय पवार यांनी केले आहे. या नाटकात प्रिया मराठे, सुबोध पंडे, संयोगिता भावे, राहुल पेठे, पल्लवी वाघ-केळकर आणि अनिकेत विश्वासराव हे कलाकार झळकत आहेत.