Marathi Actress on Pregnancy: आपला संसार उभा करण्यासाठी आपल्याला फार कष्ट उपसावे लागतात. त्यातून नवीन घर घेतानाही आपल्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. सध्या अशाच एका लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीनं आपलं मतं मांडलं आहे. तिनं यावेळी आपल्या गरोदरपणाला अनुभवही शेअर केला आहे. अभिनेत्री समीधा गुरू ही आपल्या अनेक लोकप्रिय मालिकांतून दिसली आहे. तिनं अनेक चित्रपटही केले आहेत. समीधाचा पती अभिजीत गुरू हा अभिनेता आणि सुप्रसिद्ध लेखक आहे. त्यानं अनेक मालिकांचे, चित्रपटांचे लेखन केले आहे. 'झी मराठी' वाहिनीवर सर्वाधिक गाजलेली मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेचा तो लेखकही होता. सध्या समीधानं आपल्या घराचे एक अनुभव शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी तिनं 'इट्स मज्जा'ला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केले आहे. यावेळी ती म्हणाली की, ''आम्ही गोरेगावला भाड्याने राहत होतो आणि अचानक आम्हाला ते घर सोडावं लागलं. तो ट्रिगर पॉईंट होता माझ्यासाठी आणि अभिजीतसाठीही... कारण मी गरोदर होते आणि त्या अवस्थेत घर शोधणं तसेच सामान शिफ्ट करणं कठीण झालं. आमचे मित्र- मैत्रीण सोबत होते व नातेवाईक होते परंतु तो मानसिक ताण असतो ना तो वेगळाच असतो.'' असं ती म्हणाली. 


पुढे ती सांगते की, ''त्यावेळी अभिजीतने ठरवलं की मुंबईत स्वतःचं घर घ्यायचं. कुटुंब खूप महत्वाचं असतं. प्रत्येकवेळी आपल्याला पैशांची गरज असते असं नाही. पण काही वेळा असं कुणीतरी हवं असतं जे सांगेल की हा हे कर.'' 


''तो पाठिंबा खूप गरजेचा असतो. घर घेताना आम्ही आधी पैसे जमवले. मग घर घेण्यासाठी उडी मारली आणि स्वतःचं घर घेतलं. त्या दिवसांमुळे आम्ही हा मोठा निर्णय घेतला आणि अथक परिश्रम करत अखेर घर घेतलं.'', अशी आठवण तिनं यावेळी सांगितली. सध्या अनेक मोठे सेलिब्रेटी हे घर घेताना दिसत आहेत. त्यांच्या फोटोंचीही सोशल मीडियावर बरीच चर्चा ही रंगलेली असते. त्यामुळे अशावेळी नेटकरीही त्यांच्या या फोटोंना दाद देताना दिसतात. ऋतूजा बागवे, प्राजक्ता गायकवाड यांनी नवं घरं घेतलं आहे. तर रवी जाधव, स्मिता शेवाळे या सेलिब्रेटींनी नवी कारही विकत घेतली आहे. 


हेही वाचा : 'पूर्णपणे सहमत'; नारायण मुर्तींच्या '70 तास काम करा' वक्तव्यावर प्रसिद्ध उद्योगपतीचं लक्षवेधी विधान


सध्या सोशल मीडियावर त्यांचीही बरीच चर्चा रंगलेली आहे. सध्या समीधा गुरू ही 'लवंगी मिरची' या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आली होती.