Tejaswini Pandit on Bikini : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत ही तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखली जाते. तेजस्विनी पंडीत सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. त्यातही तिचे बोल्ड लूक हे चांगलेच व्हायरल होतात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तेजस्विनीनं मराठी अभिनेत्रींनी बिकीनी घालावी का? यावर परखड प्रतिक्रिया दिलेली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेजस्विनीनं ही मुलाखत 'लोकमत फिल्मी'ला दिली होती. यावेळी तिला प्रश्न विचारण्यात आला की मराठी अभिनेत्री जेव्हा बिकिनी घालवतात, तेव्हा त्यानं खूप ट्रोल करण्यात येतं. त्यावर तिची प्रतिक्रिया विचारता तेजस्विनी म्हणाली 'सोशल मीडियाच्या कमेंट सेक्शनवर पैसे आकारले पाहिजेत. म्हणजे प्रत्येक कमेंटचे 10  रुपये. तरचं त्याचं स्वरुप बदलेल. माझं शरीर चांगलं आहे आणि मला आवडतात हे कपडे. मी घातले तर यात काहीच गैर नाही.'



तेजस्विनी पुढे याविषयी बोलताना म्हणाली 'बरं स्विमिंग पुलमध्ये बिकिनी नाही घालणार तर मग कुठे घालणार. जगण्याच्या दोन पद्धती आहेत. एक पद्धत म्हणजे तुमच्या पद्धतीने, नाहीतर लोकांच्या पद्धतीने. मग तसं वागलं पाहिजे. बिकिनी घातली तर सोशल मीडियावर फोटो टाकल्यावर खालचे कमेंट वाचायचे नाहीत आणि ट्रोल झालं तरी फरक नाही पडला पाहिजे. नाहीतर मग लोकांना वाटतं तसं वागलं पाहिजे'. 


ट्रोल करणाऱ्यांविषयी बोलत तेजस्विनी म्हणाली, 'माझ्या काही मैत्रिणींने अपत्य जन्माला घालायचे नाही, असा निर्णय घेतला. खरंतर हा नवरा आणि बायको यांचा हा खाजगी निर्णय आहे. पण, त्यावर लोकांनी फार वाईट कमेंट केल्यात. त्या कमेंट मला येथे सांगता येणार नाहीत'. 


हेही वाचा : रणवीर आणि दीपिकाने लपूनछपून केलेला साखरपुडा! अभिनेता खुलासा करत म्हणाला, 'कोण चप्पल...'


तेजस्विनी प्रधान ही तिच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखली जाते. तिच्या प्रत्येक भूमिका या प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडतात. तेजस्विनी ही फक्त एक अभिनेत्री नाही तर त्यासबत निर्माती देखील आहे. तेजस्विनीनं बांबू या चित्रपटाच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. तर लवकरच तेजस्विनी ही एकदा येऊन तर बघा या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार,  राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार देखील आहेत.