`हे` लोक रस्त्यावर SEX करतील`, लो वेस्ट साडीतील `अशा` फोटोमुळे अभिनेत्री ट्रोल
Shweta Kharat : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता खरात ही सध्या सोशल मीडियावर तिच्या एका फोटोमुळे चर्चेत आहे. तिचे साडीतील काही फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले होते. त्यावरुन तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे.
Shweta Kharat : 'मन झालं बाजिंद' ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. याच मालिकेतील अभिनेत्री श्वेता खरात ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. श्वेता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिचे अनेक बोल्ड फोटो देखील असतात. नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. इतकंच नाही तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
श्वेतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो आणि व्हिडीओत शेअर केला आहे. या फोटोत श्वेतानं निळ्या रंगाची साडी नेसली आहे. तर तिच्या या फोटोवर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंटही केल्या आहेत. तर तिनं शेअर केलेल्या फोटोत श्वेता म्हणाली प्रतिक्षेचा स्वत: एक किस्सा नाही तर त्याची एक गोष्ट आहे. श्वेताचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
श्वेताचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. यावर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'काही दिवसांनी असे लोक तर इतर लोकांसमोर रस्त्यावर सेक्स करतील.' त्यावर त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर देत श्वेता म्हणाली, 'तुमच्यासारखे म्हणायचं का तुम्हाला? कारण तुमच्या सारख्या विचारसरणीची लोक 100 टक्के करतील त्यात कोणतीही शंका नाही! मला तुमच्या घरातील स्त्रियांबद्दल खूप वाईट वाटतंय आणि तुम्हाला लहान मुलगी सुद्धा आहे. सर जरा तिच्यासाठी तरी सुधारा. मोठं झाल्यानंतर तिला तुम्हाला वडील म्हणायला लाज वाटू नये याची काळजी घ्या'. फक्त हा एक नेटकरी नाही तर अशा अनेक नेटकऱ्यांनी श्वेताला ट्रोल केले आहे. दुसरी एक नेटकरी कमेंट करत म्हणाली, 'अजून खाली नेस बाई'. अशी कमेंट करणाऱ्या या दुसऱ्या नेटकऱ्यालाही श्वेतानं सडेतोड उत्तर दिलं आहे. नको काकू ती तुमची स्पेशालिटी आहे, तुम्हीच नेसा. आय लव्ह यू काकू. पुढे श्वेतानं आणखी एका नेटकऱ्याला कमेंट करत म्हटले की क्या यार अब चिल्ला चिल्ला कर सबको स्किम बता दो.
हेही वाचा : 'आम्ही पब्लिक फिगर असतो म्हणून...', कोणत्याही गोष्टीवर मत न मांडण्यावर Anuja Sathe चं वक्तव्य
दरम्यान, ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेत श्वेतासोबत वैभव चव्हाननं महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या मालिकेनं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. आता श्वेताचा आगामी प्रोजेक्ट कोणता आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.