Surabhi Bhave Wedding Anniversary Gift : गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार चित्रपटासट वैयक्तिक आयुष्यातही हे प्रगती करताना दिसत आहेत. आता या यादीत एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नावाचाही समावेश झाला आहे. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सुरभी भावेने तिच्या पतीला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास गिफ्ट दिले आहे. याबद्दल तिने एक पोस्ट शेअर केली आहे. 


व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी मनोरंजनसृष्टीतील बेधडक आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री म्हणून सुरभी भावेला ओळखले जाते. तिने आतापर्यंत अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांतून उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. स्वामिनी या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.  आता सुरभी भावेने फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना तिने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नवऱ्याला कार गिफ्ट दिल्याचे सांगितले आहे.


पोस्टला दिले हटके कॅप्शन


मला कधीतरी आयुष्यात नवऱ्याला कार गिफ्ट करायचं डोक्यात होतं आणि फाईनली मी माझं स्वप्न पूर्ण केलंच. आज आमच्या 9th anniversary ला नवऱ्याला सरप्राईज गिफ्ट म्हणून nexon कार दिली. त्याच्या चेहेऱ्यावर असलेला आनंद आणि आनंदाने डोळ्यात आलेले पाणी हे माझं रिटर्न गिफ़्ट हे सगळं ज्यांनी टिपलं तो Pranav Dixit आणि अनिरुद्ध ह्यांना विशेष प्रेम आणि खूप thanks, असे सुरभी भावेने म्हटले आहे. 



गाडीची दाखवली झलक


या व्हिडीओत सुरभी, तिचे पती आणि तिची मुलगी दिसत आहे. यात ते दोघेही गाडीची झलक दाखवताना दिसत आहे. यावेळी तिच्या पतीच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. सध्या सुरभीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


आणखी वाचा : खास मेन्यू, अलिशान जागा अन्...; विराट कोहलीने 'या' ठिकाणी साजरा केला अनुष्काचा वाढदिवस


दरम्यान सुरभी भावेने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. काही दिवसांपूर्वी ती भाग्य दिले तू मला या मालिकेत झळकली होती. यात तिने सुवर्णा दाभोळकर हे पात्र साकारले होते. त्यानंतर तिने राणी मी होणार या मालिकेत काम केले होते. आता सुरभी भावेची ‘अबीर गुलाल’ मालिकेत वर्णी लागली आहे. सुरभीने महेश मांजरेकरांच्या ‘ही अनोखी गाठ’ चित्रपटात काम केले आहे.