Tejashri Pradhan mother Death : 'ती सध्या काय करते' फ्रेम आणि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आईचं निधन (Tejashri Pradhan mother passed away) झाल्याची माहिती समोर आली आहे. 16 नोव्हेंबर रोजी तेजश्रीच्या आई सीमा प्रधान यांनी गुरुवारी मुंबईत राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. सीमा प्रधान या गेल्या काही दिवसांपासून खूप आजारी होत्याच. अशातच आता त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनामुळे आता कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.


 कलाविश्वातून हळहळ व्यक्त


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेजश्रीच्या आईच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर कलाविश्वातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. तेजश्री आणि तिच्या आईमध्ये खूप छान नातं होतं. कोणत्याही कार्यक्रमात तिची आई तिच्याबरोबर असायची. अग्गबाई सासूबाई तेजश्रीची भूमिका तिच्या आईला फार आवडली होती. अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, सहन करत राहू नये, असं मत सीमा प्रधान यांनी मांडलं होतं. 


तेजश्रीचं काम आवडतं...


आम्ही तिचं काम पाहिलं आहे आणि आवडलं आहे, अग्गबाई सासूबाईमध्ये तिने अन्यायावर आवाज उठवला, तिची ही भूमिका माझ्यासाठी आनंददायी होती, असं सीमा प्रधान यांनी तेजश्रीचं कौतूक करताना म्हटलं होतं.


दरम्यान, तेजश्री सध्या 'तुझ्या माझ्या  प्रेमाची गोष्ट' या मालिकेत काम करत आहे. यापूर्वी तिने होणार 'सून मी या घरची', 'अग्गंबाई सासूबाई' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर, 'ती सध्या काय करते', 'डॉ. प्रकाश बाबा आमटे', 'झेंडा', 'लग्न पहावे करुन' यांसारख्या सिनेमातही झळकली होती.