Tejaswini Pandit : देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ शेअर करणाऱ्या तेजस्विनी पंडितवर कारवाई!
Tejaswini Pandit X blue tick removed : टोलवाढीच्या मुद्द्यावर आपलं मत मांडल्यानंतर अभिनेत्री तेजस्विनी पंडितचं सोशल मीडिया अकाऊंट टार्गेट करण्यात आलं होतं. तेजस्विनी पंडितने देवेंद्र फडणवीसांचा (devendra fadnavis) टोलवरील वक्तव्याचा व्हिडीओ शेअर केला होता.
Tejaswini Pandit News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा राज्यातील टोलचा प्रश्न छे़डला आहे, त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात (Maharastra Politics) मोठा गोंधळ उडाल्याचं समोर आलंय. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) एका व्हि़डीओमुळे कोंडीत पकडले गेले आहेत. अशातच आता फडणवीसांचा तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यावर मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने फडणवीसांच्या (Tejaswini Pandit) वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर आता तेजस्विनी पंडितच्या एक्स अकाऊंटवरची ब्लु टीक गायब झाली आहे. त्यामुळे तिने एक पोस्ट करत खणखणीत उत्तर दिलंय. कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहात नाही, असा मथळा देत तेजस्विनी पंडितने सवाल उपस्थित केले आहेत.
माझ्या X (ट्विटर) अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काही लोकांनी माझं स्पष्ट मत सहन न झाल्याने राजकीय दबाव टाकून काढून टाकण्यास सांगितलं, कारण का तर मी एक 'आम्हा जनतेची' इतकी वर्ष फसवणूक झाली असा वाटणारा प्रश्न उपस्थित केला म्हणून? असा सवाल तेजस्विनी पंडितने उपस्थित केला आहे.
X (ट्विटर) अकाउंटचा व्हेरिफिकेशन बॅच हा सन्मान असेल तर तो योग्य कारणासाठी जाणं, हा त्याहून मोठा सन्मान मला दिलात त्याबद्दल धन्यवाद. पण या बंदीने माझा काय किंवा सामान्य माणसांच्या मनातील आक्रोश कमी होणार नाही. सामान्यांचा आवाज बंद करणे हाच ह्यांचा बहुदा एकमात्र 'X' फॅक्टर आहे हे मात्र स्पष्ट होत जाईल. असो, माझा ‘जय हिंद जय महाराष्ट्र' साठीचा घोष योग्य वेळी सुरूच राहील.
सत्तेत कोणीका बसेना, आम्ही जनता आहोत ! जेंव्हा जेंव्हा आमची पिळवणूक होईल, दिशाभूल होईल, तेव्हा तेव्हा आमचा आवाज दुमदूमणारच आहे ! जय हिंद जय महाराष्ट्र, असं तेजस्विनी पंडितने म्हटलं आहे.
पाहा पोस्ट
दरम्यान, टोलवाढीच्या मुद्द्यावर आपलं मत मांडल्यानंतर अभिनेत्री तेजस्विनी पंडितचं सोशल मीडिया अकाऊंट टार्गेट करण्यात आलं होतं. तेजस्विनी पंडितने देवेंद्र फडणवीसांचा टोलवरील वक्तव्याचा व्हिडीओ शेअर केला होता. यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ?? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय? असा सवाल तेजस्विनीने विचारला होता.