मुंबई : सिनेसृष्टीतील कास्टिंग काऊचवर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यावर बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेने आपले मत मांडल्यानंतर आता मराठमोळी अभिनेत्री उषा जाधवही यावर मोकळेपणाने बोलली आहे. या दोन्ही अभिनेत्रींनी सिनेसृष्ट कास्टिंग काऊचचा सामना केला आहे. बीबीसी सध्या कास्टिंग काऊचवर एक डॉक्युमेंटरी बनवत आहे. याचे नाव आहे Bollywood's Dark Secret. या वीकेंडला ही डॉक्युमेंटरी प्रदर्शित केली जाईल. राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधवने याबद्दलचा आपला अनुभव शेअर केला. मला एकदा विचारण्यात आले होते की, जर संधी दिली तर त्या बदल्यात काय देशील? त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते, तसं मी त्यांना सांगितलं. तेव्हा समोरची व्यक्ती म्हणाली की, ही पैशांची गोष्ट नाही तर निर्माता किंवा दिग्दर्शकासोबत तू झोपायला तयार आहेस का? अभिनेत्री म्हणून तुला स्वखुशीनं संबंध ठेवावे.


तर राधिका आपटे म्हणते...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर राधिका आपटे म्हणाली होती की, काही लोक स्वतःला देव समजतात. ते इतके ताकदवान असतात की, त्यांना वाटते की समोरचीच्या आवाजाचे काही महत्त्व नाही आणि जर मी बोलले तर माझे करिअर संपूष्टात येईल. यावर अभिनेत्री आवाज का उठवत नाहीत? या प्रश्नावर राधिका म्हणाली की, असे स्पष्टपणे बोलल्यावर लोक याला पब्लिसिटी स्टंट म्हणतात. तर काहींना काम मिळत नसेल तर तिचे असे बोलणे म्हणजे करिअर संपल्यासारखेच आहे.


यांनीही दिली कबुली


काही दिवसांपूर्वी कास्टिंग काऊचवर सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी स्पष्टपणे मत मांडल्यावर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर काँग्रेसच्या माजी खासदार रेणुका चौधरी यांनी सर्वच क्षेत्रात महिलांना याचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले आहे. 


कोण आहे उषा जाधव?


  • राष्ट्रीय पुरस्कार विजेती मराठमोळी अभिनेत्री.

  • नाटकातून केली अभिनयाची सुरुवात.

  • २०१२ मध्ये आलेला धग हा सिनेमा तिच्या आयुष्यातील टर्निंग पाईंट ठरला. त्याच सिनेमामुळे तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

  • हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

  • ट्रॉफिक सिग्नल सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले.

  • त्यानंतर अनेक जाहिरातीतून तिने काम केले. २०१२ मध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्या सोबत कौन बनेगा करोडपती जाहिरातीत ती झळकली. 

  • याशिवाय स्टार प्लसवरील लाखो में एक या कार्यक्रमात तिने काम केले.