मुंबई : २४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला. शिवाय राज्यात राष्ट्रपती राजवट देखील लागू करण्यात आली. परंतु आज सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप पाहायला मिळाला. देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ माजली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शपथविधीनंतर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. शिवाय कलाविश्वातील मंडळींनी देखील आपले मत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ट्विटरच्या माध्यमातून तर प्रसिद्ध दिग्दर्शक प्रविण तरडेंनी फेसबूकच्या माध्यमातून आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. 



‘पवार’ play शिवाय जिंकता येत नाही….असं दिसतंय…क्रिकेट वर्ल्डकप फायनल काय नाही तर #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक काय, पण या राजकीय ड्रामा चा ‘पवार’full end झाला आहे का नाही अजून, काय वाटतंय?' असं ट्विट सोनाली कडून करण्यात आलं आहे. 


तर दुसरीकडे, '२३ नोव्हेंबर २०१८ एक वर्षापूर्वी 'मुळशी पॅटर्न' रिलिज झाला होता. आज २३ नोव्हेंबर २०१९ महाराष्ट्र पॅटर्न रिलिज झाला..' अशा प्रकारची पोस्ट प्रविण तरडेंनी केली आहे.