प्रसिद्ध नृत्यांगना आणि मराठी चित्रपट-नाटक विश्वातील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका म्हणून फुलवा खामकरला ओळखले जाते. तिने सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. फुलवाला आतापर्यंत अनेकांनी नृत्य करताना आणि टीव्हीवर रिअ‍ॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून अनेकांनी पाहिलं आहेत. त्यामुळे ती घराघरात प्रसिद्ध आहे. पण फुलवाची मुलगीही आस्माही एक उत्तम डान्सर आहे. नुकतंच तिला एक पुरस्कारही मिळाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फुलवा खामकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या फोटोत फुलवा खामकर, तिचे पती आणि मुलगी आस्मा दिसत आहे. यावेळी तिच्या हातात एक पुरस्कारही दिसत आहे. आस्मा खामकरला जयहिंद कॉलेजमधून नृत्यातील उत्कृष्ट कामगिरी आणि यशासाठीचा पुरस्कार मिळाला आहे. 


फुलवा खामकरने केले लेकीचे कौतुक


माझ्या लाडक्या आसा …. आस्मा…तुला तुझ्या जयहिंद कॉलेज मधे outsatnding performance and achievement in dance साठी अवॉर्ड मिळालं आणि मला आणि बाबाला किती किती आनंद झाला म्हणून सांगू !!! अशीच खूप खूप छान प्रगती कर..असेच खूप आणि छान छान मित्र मैत्रिणी जोड..छान आणि योग्य संगत आयुष्यात असेल तर आयुष्याला सामोर जायला बळ मिळतं….


खूप चढ उतार पाहायचे आहेत तुला आणि ते आलेच पाहिजेत तरच आयुष्यात गंमत आहे…. तू फार गोड आणि पारदर्शक मुलगी आहेस… कधीच आणि कुणासाठी सुद्धा बदलू नकोस.आपल्या मूळ स्वभावाचे चांगले वाईट परिणाम आपल्याला भोगायचे असतातच पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेव,आयुष्यात आपल्यातली पारदर्शकता आणि खरेपणा जपल्याने तुला जो आनंद मिळेल तो सगळ्यात जास्त मौल्यवान असेल….


स्पर्धा खूप आहे असणार आणि असलीच पाहिजे, प्रगती साठी ती खूप आवश्यक आहे आणि तू त्याचा भाग असण सुद्धा खूप गरजेचं आहे, मात्र ती स्वतःशी कर…मागे वळून फक्त स्वतः बरोबर स्वस्तःची तुलना कर…दुसऱ्यांशी नाही कारण प्रत्येकाचा प्रवास आणि वेळ वेगवेगळी असते… आपल्या गुरूंना कधी विसरू नकोस…त्यांचा अनादर कधीही आणि काहीही झालं तरी करू नकोस… माझं आणि बाबाचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे तुला सांगायची गरज नाही..कारण तुला माहीत आहे की तू आमच्या हृदयाचा ठोका आहेस .. जेव्हा जेव्हा तुला आमची गरज असणार तेव्हा तेव्हा आम्ही तुझ्या बरोबर असणार आहोत! खूप खूप खूप उंच भरारी घे मात्र आपल्या जमिनीला कधी विसरू नकोस- तुझी आई आणि बाबा, असे फुलवा खामकर म्हणाली आहे. 



फुलवाच्या या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. अभिनेत्री समृद्धी केळकरने अभिनंदन अशी कमेंट केली आहे. तर क्रांती रेडकरने मला तुझा खूप खूप अभिनंदन वाटतो, अशी प्रतिक्रिया यावर दिली आहे. त्याबरोबरच सुप्रिया पिळगावकर यांनीही आस्मा आम्हाला तुझा खूप खूप अभिमान वाटतो. तुझ्या आई-बाबांसाठी आम्ही खूप आनंदी आहोत, असे म्हटले आहे.