Ashok Saraf : मराठी चित्रपटसृष्टीला मिळालेला हिरा म्हणजे सर्वांचे लाडके अशोक मामा... अशोक शर्मा यांनी मराठीसह हिंदी भाषिक सिनेमा त्याचबरोबर नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant berde) आणि अशोक सराफ (Ashok Saraf) या दोन अभिनेत्याचे चित्रपट आजही अनेकजण आवर्जुन पाहतात. अशातच 'मी बहुरूपी' या आत्मकथनाच्या निमित्ताने अशोक सराफांची मुलाखत ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ (Sudhir Gadgil) यांनी पुण्यात घेतली. यावेळी त्यांनी अनेक रंजक किस्से सांगितले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनोदी अभिनयाची सुरूवात कधी झाली, असा सवाल विचारल्यानंतर अशोक सराफ यांनी रोखठोक उत्तर दिलं. 1972 साली एक होता शिंपी पासून विनोदी अभिनयाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. अन चित्रपटात डार्लिंग डार्लिंग मधून विनोदी अभिनय (Comedy Act) सुरू झाला असा म्हणता येईल, असं अशोक सराफ (Ashok Saraf) म्हणाले.


आणखी वाचा - Sara Tendulkar चा जन्म दिवस आणि सचिनच्या 25 व्या शतकाच खास कनेक्शन,जाणून घ्या


सिनेमाच्या सीनमध्ये सिगारेट ओढताना घशाला त्रास झाला अन् खोकला आला. तो आवाज थोडा वेगळाच आला. मग त्याला जोडून 'वक्ख्या विक्खी वुख्खू' हे जुळलं. हे काय ठरवून केलं नव्हतं, असं अशोक सराफ यांनी यावेळी सांगितलं. अशोक मामांनी हा प्रसंग सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.


पाहा संपुर्ण व्हिडीओ -



दरम्यान, मुलाखतीत अशोक सराफ यांनी तरूणाईसाठी देखील मोलाचा सल्ला दिला. अपयश हे येतंच, फक्त आत्मविश्वास वाया घालवू नका, असं सराफ म्हणाले. त्याचबरोबर यश पचवता आलं पाहिजे. अभिनयात नसतो तर मी तबला वादक झालो असतो, असंही अशोक सराफ यांनी यावेळी म्हटलं आहे.