बडोदा : बडोदा येथे भरलेल्या 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सरकार विरोधात ठराव मांडण्यात आला आहे. धर्मा पाटील प्रकरणावरुन साहित्यीकांनी सरकारवर टीका केली आहे.


साहित्यिकांचा तीव्र नाराजी करणारा ठराव 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धर्मा पाटील या शेतक-यानं केलेल्या आत्महत्येबद्दल साहित्यिकांनी तीव्र नाराजी करणारा ठराव मांडला. सरकार शेतकऱ्य़ांच्या बाबतीत असंवेदनशील आहे, अशी भावना व्यक्त करत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीनं सोडवावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.  


धर्मा पाटलांच्या आत्महत्येने साहित्यिक हळहळले


प्रकल्पात गेलेल्या जमीनीचा योग्य तो मोबदला मिळत नसल्याने, धर्मा पाटील या धुळ्यातून आलेल्या वयोवृद्ध शेतकऱ्याने मंत्रालयात विष प्राशन केलं होतं, उपचारादरम्यान धर्मा पाटील यांचं निधन झालं. धर्मा पाटील यांच्याशिवाय अनेक शेतकऱ्यांच्या जमीनींवर एजंटसनी डल्ला मारला आहे. मात्र सरकार यावर कोणतीही चौकशी करण्यास तयार नाही.