मुंबई : 'जय देवा जय देवा...' असं म्हणत 'जय मल्हार' या मालिकेच्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी अभिनेता देवदत्त नागे प्रेक्षकांच्या भेटीला आला. पाहता पाहता ही मालिका अशी काही लोकप्रिय झाली की त्याचा अनेकांनाच हेवा वाटू लागला. कित्येकांसाठी देवदत्तच खऱ्याखुऱ्या खंडेरायांचं स्वरुप होता. असा हा लोकप्रिय अभिनेता 'डॉक्टर डॉन' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१२ फेब्रुवारीपासून त्याची ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यामध्ये देवदत्त एका अफलातून डॉनच्या आणि सोबतच एका डॉक्टरच्याही भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या या आगामी मालिकेचे रंजक प्रोमोही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येत आहेत. ज्यामध्ये देवदत्तचा अंदाज साऱ्यांची मनं जिंकत आहे. 


'झी युवा'कडून पोस्ट करण्यात आलेल्या मालिकेच्या या नव्या प्रोमोमध्ये त्याची आणि अभिनेत्री श्वेता शिंदेची ऑनस्क्रीन केमिस्ट्री दिसत आहे. देवाssss मी तुला सोडणार नाही, असं म्हणणाऱ्या श्वेताकडे पाहणाऱ्या देवदत्तच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव या अवघ्या काही सेकंदांच्या प्रोमोलाही रंगतदार करत आहेत. 



वाचा : विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ


'डॅशिंग डॉनची, डार्लिंग डीन', अशा कॅप्शनसह झी युवाकडून हा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात आला आहे. हजारो व्ह्यूज असणारा हा प्रोमो कित्येकांनी शेअरही केला आहे. तेव्हा आता येत्या काळात जय मल्हारक़डून थेट डॉनपर्यंतचा प्रवास करणाऱ्या देवदत्तच्या या भूमिकेला आणि श्वेता शिंदेच्या नव्या इनिंगला प्रेक्षक कशी दाद देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.