मुंबई : बॉलिवूडमध्ये आता अनेक कलाकार पालक होण्याच्या तयारीत आहेत. तिथेच मराठी इंडस्ट्रीतील कलाकार दोनाचे चार हात करण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. मराठी इंडस्ट्रीतील एक अशी व्यक्ती ज्याने आपल्या लिखाणातून, दिग्दर्शनातून कायमच प्रेक्षकांच मनोरंजन केलं असा क्षितीज पटवर्धन लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

21 सप्टेंबरला क्षितीज पटवर्धनने पल्लवी सावंत हिच्यासोबत साखरपुडा केला. या सारखपुड्याला त्याचे नातेवाईक आणि अगदी जवळची कलाकार मंडळी उपस्थित होती. या सगळ्यांनी क्षितीज आणि पल्लवीला खूप खूप शुभेच्छा दिल्या. एकमेकांच्या प्रेमात असलेले क्षितीज आणि पल्लवी लवकरच लग्न करणार आहेत. 



कुणाशी झाला साखरपुडा?


क्षितीज पटवर्धनने पल्लवी सावंतशी साखरपुडा केला आहे. पल्लवी ही स्पोर्ट्स न्युट्रिशअनिस्ट आहे तसचे कॉर्पोरेट क्षेत्रात फूड आणि न्यूट्रिशिअन्सवर ती सल्लागार म्हणून काम करते. या दोघांच हे लव्हमॅरेज आहे. आता साखरपुडा पार पडल्यावर चाहते या दोघांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. 




क्षितीज पटवर्धन हा मल्टी टॅलेंटेड असून तो लेखक आहे. क्षितीजने अनेक सिनेमांकरता पटकथा, संवाद लेखन केलं आहे. 'सतरंगी रे', 'टाईम प्लीज', 'लग्न पहावे करून', 'टाईमपास 2', 'डबल सिट', 'YZ', 'फास्टर फेणे' तसेच आता रितेश देशमुखचा आगामी सिनेमा 'माऊली'चं लिखाण देखील क्षितीज करत आहे. तसेच त्यांने गाणी देखील लिहिली आहेत. 100 हून अधिक गाणी क्षितीजने लिहिली आहेत. 'दगडी चाळ'मधील 'धागा धागा', 'पोस्टर गर्ल'मधील 'आवाज वाढव डीजे तुला' तसेच 'डबल सीट'मधील अतिशय लोकप्रिय गाणं 'मोहिनी' आणि क्षणभर मंत्रमुग्ध करणार 'बापजन्म' या सिनेमातील 'शेवंतीचं फुलं' अशी असंख्य लोकप्रिय गाणी क्षितीज पटवर्धनने लिहिली आहेत.