'राशी'नुसार कसा निवडावा Perfume ? काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या राशीप्रमाणे परफ्युम निवडल्याने याचा तुमच्या कुंडलीतील ग्रह सुधारण्यास मदत होते. तसंच तुमच्यातील साकारात्मक वाढण्यास मदत होते. 

Jun 30, 2024, 17:27 PM IST

शरीराला घामाचा उग्र वास येऊ नये म्हणून परफ्युम वापरला जातो. मात्र हे सुंगधी द्रव्यामुळे फक्त शरीराची दुर्गंधी दूर होत नाही तर, सुवासामुळे तुमची मानसिकता सुधारण्यास मदत होते. 

1/12

मेष

मेषेचा स्वामी हा मंगळ ग्रह आहे. ही माणसं काही तापट स्वभावाची असतात. त्यामुळे यांना सतत घाम जास्त येतो. म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार यांनी 'मोगऱ्या'चा परफ्युम वापरावा. मोगऱ्याच्या सुवासाने यांच्यातील राग आटोक्यात येण्यास मदत होते. 

2/12

वृषभ

वृषभ राशी शुक्राच्या अंबलाखाली येत असल्याने ही या राशीची माणसं रोमँटीक स्वभावाची असातात. त्यामुळे यांच्या व्यक्तित्त्वाला 'चमेली'चा परफ्युम साजेसा ठरतो. 

3/12

मिथुन

मिथुन राशीची माणसं बुद्धीवान असतात. बुध राशी स्वामी असल्याने याचं संवादकौशल्य उत्तम असतं. ही मंडळी मार्केटींग आणि जाहिरात क्षेत्रात चांगलं काम करतात. म्हणूनच 'चमेली'च्या परफ्युमचा वापर केल्याने कामाच्या ठिकाणी यांना मान सन्मान मिळण्य़ास मदत होते.    

4/12

कर्क राशी

स्त्रीत्वाची राशी असलेल्या या मंडळीचा स्वामी चंद्रदेव आहे. चंद्राप्रमाणेच ही माणसं शांत पण चंचल स्वभावाची असतात. यांच्या चंचल स्वभामुळे हे अनेकदा अडचणीत सापडतात.कर्क राशीच्या व्यक्तींना 'लव्हेंडर फ्लेवर' असलेला परफ्युम वापरणं फायद्याचं ठरतं.   

5/12

सिंह

सूर्य देवाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या या राशीची मंडळी तेजस्वी आणि आत्मविश्वासाने वावरणारी असतात. यांच्यात नेतृत्त्व कौशल्य चांगले असते. या मंडळींनी 'चॉकलेट' किंवा 'व्हॅनिला' फ्लेवरचा परफ्युम वापरावेत.   

6/12

कन्या

मिथुनप्रमाणेच कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. ही माणसं नाजूक आणि भावनिक असतात. घर,संसार आणि कुटुंब यांना जास्त प्रिय असते. म्हणूनच यांना 'गुलाब' किंवा 'चमेली'चा परफ्युम यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे वाटतात. 

7/12

तुळ राशी

तुळेचा स्वामी ही शुक्र ग्रह असल्याने ही मंडळी ही रोमँटीक आणि कलारसिक असतात. ही माणसं त्यांच्या दिसण्याने आणि समतोल स्वभावाने इतरांचं लक्ष वेधून घेतात. या राशीच्या व्यक्तींना 'चॉकलेट' किंवा 'चमेली'चा परफ्य़ुम साजेसा ठरतो. 

8/12

वृश्चिक

मंगळाच्या अधिपत्त्याखाली असलेली ही रास गूढ स्वभावाची असते. हे सहसा मनातलं कधीच कोणाला सांगत नाही. या राशीच्या माणसांना 'चंदन' आणि 'गुलाबा'चा परफ्युम वापरणं फायदेशीर ठरतं.   

9/12

धनू

धनू राशीची माणसं निश्चयी स्वभावाची असतात. गुरु ग्रह यांचा राशी स्वामी असल्याने संस्कारी आणि आदरयुक्त वागणं हे यांचं वैशिष्ट्यं आहे. या मंडळींना 'चंदन' ,'चमेली' आणि 'मोगऱ्या'चा परफ्युम वापरावा. 

10/12

मकर

मकर राशीची माणसं कष्टाळू वृत्तीची असतात. यांचा राशी स्वामी शनीदेव असल्याने परिस्थितीमुळे हे कमी वयातच समजुतदार झालेले असतात. यांनी 'कस्तुरी फ्लेवर' असलेला परफ्युम वापरल्यास सकारात्मकता वाढीस लागते. 

11/12

कुंभ

वायुत्त्वाची रास असलेल्या या मंडळीचा राशी स्वामी देखील शनी ग्रह आहे. या राशीचे स्वामींना स्वतंत्र राहायला आवडतं. काही अंशी माणसं तापट असली तरी अभ्यासू वृत्तीचे असतात. म्हणूनच  'स्मोकी' आणि 'इन्टेन्स वूडी' किंवा 'अंबर नोट्स परफ्युम' यांच्या व्यक्तिमत्त्वाला खुलवतात. 

12/12

मीन

गुरुच्या अधिपत्याखाली असणारी ही रास जलतत्त्वाची आहे. या राशीची माणसं हळव्या मनाची असतात. या राशीच्या मंडळींना  'कस्तुरी'चा परफ्युम लाभदायी ठरतो.  ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )