मुंबई : 'बिग बॉस ओटीटी'पासून नेहा भसीन आणि निशांत भट्ट यांची चांगलीच चर्चा आहे. आता नेहाने निशांतसोबत मस्ती करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि या फोटोंसोबतच एक खास कॅप्शनही लिहिलं आहे. नेहा आणि निशांतचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि चाहते त्यांच्या मैत्रीवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहा भसीनची पोस्ट
या फोटोंमध्ये तुम्ही बघू शकता की, नेहा भसीन आणि निशांत भट्ट एकमेकांना किस करताना दिसत आहेत आणि एकमेकांच्या खूप जवळ दिसत आहेत. हे फोटो शेअर करत नेहाने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ''गनतुंडी म्हणजेच निशू, मला फक्त तुला एवढचं सांगायचं आहे की, मला तुला मिठी मारणं, तुझ्याशी बोलणं, तुला चावणं, ओरडणं आणि तुझ्यासोबत असामान्य गोष्टी करायला खूप आवडतं. तु तेडा है पर मेरा है. आनंदी रहा, खुश रहा.''


निशांत भट्टची कमेंट
नेहा भसीनच्या या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट करत निशांत भट्टने लिहिलं की, 'डायन, मी डायनचा राजा आहे. लव्ह यू सुरचुंडी'. नेहा भसीन तिच्या गाण्यासोबतच तिच्या बोल्ड फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. बिग बॉसमध्येही, नेहा भसीन तिच्या फॅशन सेन्सने चाहत्यांना प्रभावित केलं आहे.



गुपचूप लग्न केलं
'लौंग गवाचा', 'जग घूमेया', 'कुछ खास', 'दिल दियां गल्ला' यांसारख्या सुपरहिट गाण्यांनी इंडस्ट्रीत ठसा उमटवणारी गायिका नेहा भसीनने इटलीतील टस्कनी येथे संगीतकार समीरुद्दीनसोबत 2017 मध्ये गुपचूप लग्न केलं. गायिकेने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.