मृण्मयीचे बहिणीसोबतचे `हे` गाणे तुम्ही ऐकले का?
मराठी सिनेसृष्टीतील लाडकी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवला आहे.
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील लाडकी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवला आहे. त्याचबरोबर तिचे गोड दिसणे आणि लाघवी हसणेही प्रेक्षकांना भूरळ पाडते. इतकंच नाही तर तिचे बहारदार नृत्य आपल्यालाही डोलायला लावते. पण आता मृण्मयीची नवी कला समोर आली आहे. ती म्हणजे मृण्मयी उत्तम गाते देखील.
त्याचीच प्रचिती देणारा हा व्हिडिओ पाहा....
देशपांडे भगिनींचे आवडते गाणे यात त्या गात आहेत. नभ उतरु आलं... गाण्याचा हा व्हिडिओ आधी गौतमी आणि #Repost म्हणत मृण्मयीने शेअर केला.
मृण्मयीने आपली मोठी बहिण गौतमी देशपांडे हिच्यासोबत तिच्या आवडीचे हे गाणे गाऊन पावसाळी वातावरण अधिकच अल्हाददायक केले आहे. मृण्मयीच्या अभिनय, नृत्य या कलांची ओळख आपल्याला होतीच. पण आता तिचे गायनही आपण ऐकले. यावरुन मृण्मयी ही अष्टपैलू कलाकार आहे, असे म्हटले तर वागवे ठरणार नाही.