`हा तर बेशरमपणा`, वडिलांसमोर पतीला Kiss केल्यानं Masaba Gupta ट्रोल
Masaba Gupta चा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. वडिलांसमोर पतीला Kiss केल्यानं मसाबाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.
Masaba Gupta Troll : बॉलिवूड लोकप्रिय अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांची लेक आणि फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता (Masaba Gupta) ही काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. मसाबानं 27 जानेवारी 2023 रोजी दुसऱ्यांदा सप्तपदी घेतल्या आहेत. (Masaba Gupta's Second Marriage) मसाबानं तिचं हे दुसरं लग्न तिचा बॉयफ्रेंड सत्यदीप मिश्रासोबत (Satyadeep Misra) केलं आहे. तिच्या लग्नात कुटुंबातील लोक आणि जवळच्या मित्रांनी हजेरी लावली होती. तिच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर त्यांनी एका पार्टीचे आयोजन केले होते. मसाबाच्या या पार्टीत तिचे वडील विवियन रिचर्ड्स (Vivian Richards) यांनी देखील हजेरी लावली होती. यासोबतच बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. दरम्यान, मसाबाच्या या पार्टीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मसाबा तिचा पती सत्यदीपला लिप लॉक करताना दिसत आहे. त्यामुळे मसाबाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहेत.
मसाबाचा हा व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूड या पेजवरून शेअर करण्यात आले आहेत. मसाबानं या व्हिडीओत काळ्या रंगाचा बॉडी हगींग टॉप आणि निळ्या रंगाचं स्कर्ट परिधान केलं आहे. मसाबाला तिच्या ड्रेसिंगवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल तर केले. मात्र, मसाबा आणि तिचा पती सत्यदीपचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत केक कापल्यानंतर मसाबा आणि सत्यदीप लिपलॉक करताना दिसतात. मसाबा आणि सत्यदीप जेव्हा एकमेकांना किस करतात तेव्हा तिथे उपस्थित असलेले सगळे प्रेक्षक हे त्यांना चीअर करताना दिसत आहे. मसाबा आणि सत्यदीप यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी मसाबाला ट्रोल करत अनेक गोष्टी सुनावल्या आहेत. (Masaba Gupta Liplock Video With Husband Satyadeep Misra)
हेही वाचा : Malaika Arora नं परिधान केले Urfi Javed चे कपडे? मलायकाचा ट्रास्परंट ड्रेस पाहून नेटकरी हैराण
मसाबा आणि सत्यदीपच्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, हे पाश्चिमात्य देशांच्या परंपरा आणत आहेत. दुसरा नेटकरी म्हणाला, प्रेम हे पडद्याच्या आत असेल तरच चांगले दिसते. तिसरा नेटकरी म्हणाला, मसाबाचे वडील पाहत आहेत. आणखी एक नेटकरी म्हणाला, ब्रिटीश लोक गेलेत पण यांना सोडून गेलेत. दुसरा नेटकरी म्हणाला, हा बेशरम पणा गरजेचा आहे का?
Masaba Gupta Satyadeep Misra चं दुसरं लग्न
मसाबा गुप्ता आणि सत्यदीप मिश्रा यांची भेट 'मसाबा मसाबा' या वेब शोच्या सेटवर झाली होती. तिथून त्यांची मैत्री झाली आणि हळूहळू त्यांच्या मैत्रीचं रुपांतप प्रेमात झालं. आणि आता हे जोडपे लग्न करून एकमेकांचे बनले आहेत. माहितीसाठी, मसाबा गुप्ताचं पहिलं लग्न फिल्ममेकर मधु मंटेनासोबत झालं होतं. मात्र, लग्नाच्या पाच वर्षांनंतर 2020 मध्ये दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सत्यदीप मिश्रा यांचंही हे दुसरं लग्न आहे. त्याचं पहिलं लग्न आदिती राव हैदरी हिच्याशी झालं होतं. पण 2013 मध्ये आदिती आणि सत्यदीपने घटस्फोट घेतला.