Video : Malaika Arora नं परिधान केले Urfi Javed चे कपडे? मलायकाचा ट्रास्परंट ड्रेस पाहून नेटकरी हैराण

Malaika Arora चा पार्टीतील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. 

Updated: Feb 1, 2023, 11:47 AM IST
Video : Malaika Arora नं परिधान केले Urfi Javed चे कपडे? मलायकाचा ट्रास्परंट ड्रेस पाहून नेटकरी हैराण title=

Malaika Arora Troll For Wearing Same Dress as Urfi Javed : अभिनेत्रींना त्यांचा फॅशन गेम ऑन पॉइंट ठेवावा लागतो. आज काल फॅशन म्हटलं की सगळ्यांना आठवते उर्फी जावेद (Urfi Javed). उर्फी जावेद 'बिग बॉस ओटीटी'साठी ओळखली जाते. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही फॅशनच्या बाबतीत कमी नाही. मलायका काल तिची बहीण अमृता अरोराच्या (Amrita Arora) वाढदिवसानिमित्तानं बॉलिवूडची बेबो म्हणजे करीना कपूरच्या (Kareena Kapoor Khan) घरी असलेल्या पार्टीसाठी पोहोचली होती. यावेळी मलायकानं परिधान केलेल्या ड्रेसनं सगळ्यांना उर्फीची आठवण झाली. मलायकानं उर्फीसारखाच एक टॉप परिधान केलं आहे. उर्फीनं काही दिवसांपूर्वीच असा पोशाख परिधान केला होता. यामुळे नेटकऱ्यांनी मलायकाला ट्रोल केले आहे. 

मलायकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा मलायकाचा हा व्हिडीओ व्हूम्पला या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. मलायकाला करीनाच्या घराच्या बाहेर स्पॉट करण्यात आले होते. यावेळी मलायकानं बहिणीच्या बर्थडे पार्टीसाठी काळ्या रंगाचा टॉप परिधान केला होता. मलायकाचा हा टॉप पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मलायकानं उर्फीचा टॉप परिधान केला अशा अनेक कमेंट या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडिओमध्ये मलायकाच्या लूकच्या खाली उर्फीचा लूकही दाखवण्यात आला आहे. उर्फीचा आणि मलायकाचा हा लूक सारखाच आहे. मलायकाचा हा टॉप अर्धा ट्रान्सपरेंट असल्याचे म्हटले जात आहे. मलायकाला ट्रोल करत असताना काही नेटकऱ्यांनी मलायकाच्या लूकचे कौतूक केले आहे. 

हेही वाचा : राहाच्या जन्मानंतर Alia Bhatt चं करिअर येणार स्लो ट्रॅकवर? अभिनेत्रीचा खुलासा

मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. मलायका तिच्या कामा पेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहते. काही दिवसांपूर्वी मलायकाचा मुव्हिंग इन विथ मलायका या शोमध्ये दिसली होती. या शोमध्ये मलायकाचे खासगी आयुष्य सगळ्यांना पाहायला मिळाले होते. 

मलायका सगळ्यात जास्त चर्चेत असण्याचं कारण तिचं आणि अभिनेता अर्जुन कपूरचं रिलेशनशिप. त्या दोघांच्या वयात असलेल्या फरकामुळे ते नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. बऱ्याचवेळा मलायका आणि अर्जुनला पाहून नेटकरी तिला म्हातारी किंवा मग आई आणि मुलगासोबत आहेत अशा कमेंट करताना दिसतात. 2017 मध्ये अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबत (Arjun Kapoor) रिलेशनशिपमध्ये आली. दोघे गेल्या 5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. तर दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जाते. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x