मोठ्या बजेटचे चित्रपट करुणही मिळाली नाही ओळख..., त्यानंतर अभिनेत्रीला प्रसिद्धीसाठी पाच अभिनेत्यांसोबत करावं लागलं असं काम?
जाणून घ्या, कोण आहे `ही` अभिनेत्री?
मुंबई : यशराज बॅनरच्या चित्रपटातून पदार्पण करणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं आणि काही कलाकार असतात ज्यांचं हे स्वप्न पूर्ण होतं. अभिनेत्री ट्युलिप जोशीचं (Tulip Joshi) हे स्वप्न दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्या 'मेरे यार की शादी है' या चित्रपटातून पूर्ण झालं. तरी देखील ट्युलिप तिच्या करिअरमध्ये यशस्वी होऊ शकली नाही. 13 वर्षांच्या आपल्या संपूर्ण करिअरमध्ये ट्यूलिपनं सुमारे 14 हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं, ज्यामध्ये एकही चित्रपट सुपरहिट झाला नाही. हिंदी व्यतिरिक्त तिनं तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम केलं, परंतु तिथेही तिला फारसं यश मिळालं नाही. आज म्हणजेच 11 सप्टेंबर रोजी ट्यूलिप जोशीचा 43 वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्तानं काही खास गोष्टी जाणून घेऊ या...
आणखी वाचा : इच्छेविरुद्ध लग्न करण्यासाठी पालकांचा दबाव? 'या' प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या मूलीनं संपवलं जीवन
ट्यूलिपचा जन्म 11 सप्टेंबर 1979 रोजी मुंबईत झाला. तिचे वडील गुजराती आणि आई अरमेनियन आहे. ट्यूलिपचं शालेय शिक्षण मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूलमधून झालं आणि विवेक कॉलेजमधून मेजरिंग फूड सायन्स अँड केमिस्ट्रीमध्ये पदवीचं शिक्षण घेतलं. सन 2000 मध्ये, ट्यूलिपनं फेमिना मिस इंडिया स्पर्धेतही भाग घेतला होता, परंतु विजेतेपद मिळवू शकली नाही. मात्र, त्यानंतर तिला सियाराम, पेप्सी आणि बीपीएल सारख्या अनेक नामांकित ब्रँडच्या जाहिराती मिळू लागल्या. नुसरत फतेह अली खान यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बनवलेल्या व्हिडिओमध्येही ती दिसली होती.
आणखी वाचा : सुष्मिता सेन- ललित मोदींच्या रिलेशनशिपवर कपिल शर्मा म्हणाला..., एकदा वाचा
ट्यूलिपनं 2002 मध्ये यशराजच्या 'मेरे यार की शादी है' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. खरंतर, निर्माता आदित्य चोप्रा एका मित्राच्या लग्नाला गेले होते, जिथे त्यांनी पहिल्यांदा ट्यूलिपला पाहिलं. त्याचवेळी आदित्य ट्यूलिपला 'मेरे यार की शादी है'साठी ऑडिशन देण्यास सांगितलं. गंमत म्हणजे तोपर्यंत ट्युलिपला हिंदी नीट येत नव्हती. अशा परिस्थितीत आदित्य यांनीच तिला फिरोज खान स्टुडिओत हिंदीचे प्रशिक्षण दिले. 'मेरे यार की शादी है' बद्दल बोलायचं तर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली, पण ट्युलिपला खरी ओळख त्याच्या पुढच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'मातृभूमी' या चित्रपटातून मिळाली. (matrubhoomi a nation without women fame actress tulip joshi birthday)
आणखी वाचा : सैफने खांद्यावर हात ठेवताच का भडकली अमृता? घटस्फोटानंतर दोघांमधील 'ती' गोष्ट समोर
2003 मध्ये, ट्युलिपनं 'खलनायक' या चित्रपटातून तेलगु चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ‘मातृभूमी’ हा तिचा दुसरा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. जरी 'मातृभूमी' बॉक्स ऑफिसवर यश मिळवू शकला नाही, तरीही ट्यूलिपचं तिच्या भूमिकेसाठी आणि चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी खूप कौतुक करण्यात आलं. हा चित्रपट स्त्री भ्रूणहत्येसारख्या संवेदनशील विषयावर आधारित होता, ज्यामध्ये ट्युलिपनं कल्कीची भूमिका साकारली होती. चित्रपटात कल्की पाच भावांशी लग्न करते आणि आठवड्यातील प्रत्येक रात्र तिला वेगवेगळ्या भावांसोबत घालवावी लागते. एवढंच नाही तर लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच सासरच्यांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जाते.
आणखी वाचा : ईशाचा Braless बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड लूक चर्चेत, फोटो Viral
यानंतर ट्युलिपचं करिअर बॉलिवूडमध्ये फार काळ राहिलं नाही. यानंतर ट्युलिपनं शाहिद कपूरसोबत 'दिल मांगे मोर' चित्रपटात काम केलं. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. ट्यूलिपनं 'धोखा', 'सुपरस्टार', डॅडी कूल', 'रनवे', 'हॉस्टेल' आणि 'बी केअरफुल' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले जे चित्रपट जवळजवळ फ्लॉप झाले. ट्यूलिपचा शेवटचा चित्रपट सलमान खान स्टारर 'जय हो' होता. 2014 नंतर ती चित्रपटात दिसली नाही.
आणखी वाचा : Vicky kaushal नं सार्वजनिक ठिकाणी पत्नी कतरिनाला केला असा इशारा, नेटकरी म्हणाले 'नक्की काय करायचं होतं...'
'जय हो' या चित्रपटानंतर ट्युलिप एअरलाइन्स या टीव्ही मालिकेतही दिसली. ही सीरिज 24 ऑगस्ट 2014 ते 1 फेब्रुवारी 2015 सुरु होती. तेव्हापासून ट्यूलिप गेल्या 7 वर्षांपासून ग्लॅमर जगतापासून दूर आहे. आजकाल ट्युलिप पती विनोदची ६०० कोटींची कंपनी सांभाळत आहे. ट्यूलिप या कंपनीची संचालकही आहे. विनोद हे 1989 ते 1995 दरम्यान 6 वर्षे भारतीय लष्करात होते. ते पंजाब रेजिमेंटच्या 19 व्या बटालियनमध्ये होते.