Ramayan Child Actor: रामायण या मालिकेनं घराघरात लोकप्रियता मिळवली आहे. रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेनं प्रचंड लोकप्रियता मिळवली. लॉकडाऊनमध्येही ही मालिका कोट्यवधी लोकांनी पाहिली होती. त्यामुळे या मालिकेचा टीआरपी तेव्हा सर्वात जास्त होता. दुरदर्शन ही मालिका दर रविवारी लागायची. तेव्हा अक्षरक्ष: ही मालिका पाहण्यासाठी रस्ते ओस पडायचे. तरूण वर्ग, कपल्स, शाळेतील लहान मुलं, वयस्कर मंडंळी सगळेच जण ही मालिका पाहायचेच पाहायचे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असायची.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम आणि सीता, लक्ष्मण यांची भुमिका करणारे अरूण गोविल, सुनील लहरी, दीपिका चिखालिया यांचीही प्रचंड लोकप्रियता होती. हे संपुर्ण रामायण होते. त्यानंतर या मालिकेतून आलेल्या छोट्या लव आणि कुश या दोघांचीही जोरात चर्चा होती. आज हे दोघं जण मोठे झाले आहेत आणि आपापल्या क्षेत्रात उंच भरारी मारत आहेत. या दोन्ही बालकलाकारांचे नावं होते स्वप्नील जोशी आणि मयुरेश क्षेत्रमाडे. 


रामायण या मालिकेतून लव कुश यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. कुशची भुमिका स्वप्नील जोशी यानं केली होती. तर लवची भुमिका ही मयुरेश क्षेत्रमाडे यानं केली होती. आज ते दोघंही जण मोठे झाले असून आजही त्यांनी अनेकदा चर्चा रंगलेली असते. स्वप्नील जोशी हा मराठीतला सुपरस्टार आहे. त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. मयुरेश क्षेत्रमाडे हा मात्र अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. परंतु तरीही त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. तो आज एका मोठ्या कंपनीचा सीईओ आहे आणि तो सध्या अमेरिकेस वास्तव्याला आहे. 


हेही वाचा :The Vaccine War मध्ये दिसणार नाना पाटेकर! पहिलं पोस्टर पाहून चाहते इम्प्रेस; प्रतिक्रिया फारच बोलक्या


मयुरेश क्षेत्रमाडे यानं अभिनयापेक्षा अभ्यासावर लक्ष केद्रिंत केले होते. तो कमिश्न जंक्सन एफिलिएट या कंपनीचा सीईओ आहे. तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहे. तो आपल्या परिवारासह अमेरिकेस वास्तव्याला आहे. त्याला दोन मुलीदेखील आहेत. सोबतच तो आपले फोटोही सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. त्यामुळे तो चर्चेत असतो. यावेळी त्याची विशेष चर्चा रंगेली आहे. स्पाइट एंड डेवलपमेंट नावाचं एक पुस्तकंही त्यानं लिहिलं आहे. त्यामुळे आपल्या क्षेत्रात त्यानं फार मोठं नावं कमावलं आहे. सोबतच तो आता एक यशस्वी बिझनेसमनही आहे.