अभिनेत्री मयुरी देशमुखचा `लग्नकल्लोळ`; मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला
अभिनेत्री भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधवचा नवा सिनेमा येत्या १ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लग्नकल्लोळ असं या सिनेमाचं नाव असून या सिनेमातील कलाकारांची पहिली झलक समोर आली आहे. समोर आलेलं मोशन पोस्टर सध्या सोशल मीडियावर चर्चेटचा विषय ठरत आहे.
मुंबई : काही दिवसांपूर्वीच 'लग्न कल्लोळ' चित्रपटाचे एक जबरदस्त मोशन पोस्टर आपल्या भेटीला आले होते. पोस्टरमध्ये भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव पाठमोरे दिसत होते आता त्यांच्या लूकवरील पडदा उठला असून त्यांचे चेहरे समोर आले आहेत. सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान दोघेही मुंडावळ्या बांधून वरमाला घेऊन सज्ज आहेत. मात्र दोघांपैकी कोण मयुरीच्या गळ्यात ही वरमाला घालणार, हे अद्याप गुपित आहे. हे गुपित १ मार्चला उलगडणार आहे.
मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित 'लग्न कल्लोळ' या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक, निर्माते डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे म्हणतात, " चित्रपटात या तिघांच्या भूमिका आहेत, हे यापूर्वीच जाहीर झाले आहे. आता त्यांचे लूक प्रेक्षकांसमोर आले आहेत. हा चित्रपटात प्रेक्षकांना धमाल पाहायला मिळणार आहे. हे कलाकारच इतके कमाल आहेत की, हे कल्लोळ करणार हे नक्की !’’
मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित 'लग्न कल्लोळ' या चित्रपटाचे नवीन मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकलं आहे. या जबरदस्त पोस्टरमध्ये भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव लग्नाच्या पेहरावात दिसत आहेत. तिघांच्याही हातात हार असून आता ही वरमाला कोणाच्या गळ्यात पडणार, हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तत्पूर्वी या नवीन पोस्टरसोबत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली असून हा 'लग्न कल्लोळ' १ मार्चला होणार आहे. मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे.
अभिनेत्री मयुरी देशमुखने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लिहीलं आहे की,''झणझणल्या काळजावरती ग्वाड झाला हमला अन् व्हय नाई व्हय नाई म्हणता घट्ट मामला जमला..!! सनई चौघडे वाजणार, लग्न पंचक्रोशीत गाजणार.. लग्न कल्लोळआहेराची तारीख १ मार्च २०२४''
'लग्न कल्लोळ' या चित्रपटाच्या नावावरून आणि मोशन पोस्टरवरून हा चित्रपट 'लग्न' या विषयावर भाष्य करणारा चित्रपट आहे, हे दिसतेय. मात्र आता यात 'कल्लोळ' काय पहायाला मिळणार, याचे उत्तर मात्र चित्रपटच देऊ शकेल. दरम्यान या चित्रपटाचे पोस्टर अतिशय कलरफुल आणि प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे आहे.