नवी दिल्ली : ९० च्या दशकातील 'पापा कहते हैं' हा चित्रपट तुमच्या लक्षात असेलच. या चित्रपटातील अभिनेता जुगल हंसराज याने आपल्या सुंदर डोळ्यांनी अनेकांची मने जिंकली होती. तर या चित्रपटातील अभिनेत्री मयूरी कांगोच्या अदा देखील घायाळ करणाऱ्या होत्या. मात्र या चित्रपटानंतर ती पुन्हा इतर चित्रपटात दिसली नाही.


सध्या काय करते ती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२००० मध्ये आलेल्या 'वामसी' या तेलगू चित्रपटात ती शेवटची झळकली. त्यानंतर ती चित्रपटात तर नाहीच पण बॉलिवूड इव्हेंट आणि पार्टीतही दिसली नाही. बॉलिवूडमधून अचानक गायब झालेली ही अभिनेत्री आता एका कंपनीत काम करते. चित्रपटसृष्टीची चंदेरी दुनिया सोडून ती आता गुडगावच्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करत आहे. मयूरी सध्या मॅनेजिंक डिरेक्टर म्हणून काम पाहते.


अभिनयातील करियर


मयूरी कांगोने १९९५ मध्ये आलेल्या नसीम या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पर्दापण केले. 'पापा कहते है' नंतर अजय देवगण आणि अरशद वारसीसोबतच्या होगी प्यार की जीत या चित्रपटात तिने काम केले होते. मात्र चित्रपटात फारसे यश न मिळाल्याने तिने टी.व्ही मालिकांमध्ये आपले नशीब आजमावले. नरगिस, थोडा गम थोडी खुशी, डॉलर बाबू आणि किट्टी पार्टी या तिच्या काही मालिका.



लग्न झाले आणि...


मात्र त्यानंतर तिने २००३ मध्ये एनआरआय आदित्य ढिल्लनसोबत औरंगाबादमध्ये लग्न केले. त्यानंतर ती नवऱ्यासोबत अमेरिकेला शिफ्ट झाली. त्यानंतर तिथे तिने मार्केटींग आणि फायनांसमध्ये एमबीए केले. त्यानंतर तिने नोकरीला सुरूवात केली.