`माझ्या नवऱ्याची बायको` - राधिकाला नेमकं झालंय तरी काय?
`माझ्या नवऱ्याची बायको` या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेच्या कालच्या एपिसोडची सुरुवात कोर्टाबाहेरून होते.
मुंबई : 'माझ्या नवऱ्याची बायको' या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेच्या कालच्या एपिसोडची सुरुवात कोर्टाबाहेरून होते, जिथे शनायावर वैतागलेला गुरु तिला रागाने कोर्टात का आलीस याचा जाब विचारात असतो. तेवढ्यात त्यांच्या सोबत असलेले गुरुचे वकील गुरूला म्हणतात आता ती आलीच आहे तर त्याचा आपण फायदा करून घेऊ आणि त्या तिघांच्यात काहीतरी गुपचूप चर्चा होते.
दरम्यान राधिकाची वकील कोर्टात छान बोलल्याने राधिकाचे कौतुक करते आणि देसाई वकील पुढे हवेनको ते प्रश्न विचारतील म्हणून सावध करते. तिकडे राधिकाच्या काळजीने नाना नानी काळजीत पडलेले असतात.
पुढे बोलता बोलता समिधा म्हणते की, गुरुनाथशी राधिकाने कशाला पॅचअप् करायला हवं? या साऱ्या परिस्थिला राधिका मोठ्या हिमतीने सामोरी जाईल आणि खंबीरपणे उभी राहील असे नाना म्हणतात. काही वेळाने पुन्हा कोर्टामध्ये देसाई वकील खटल्याची सुरुवात करताना न्यायमूर्तींना गुरुनाथची ही बाजून ऐकून घेण्याची विनंती करतात.
गुरुनाथची बाजू मांडताना देसाई वकील म्हणतात की, गावाकडे जीवन जागणाऱ्या राधिका सुभेदार या मुंबईत राहूनही तशाच राहिल्या जशा गावाकडं होत्या, त्यांच्यात कधी कुठलाच बदल घडला नाही.
त्यासाठी गुरुनाथ यांनी खूप प्रयत्न केले परंतु राधिका काही बदलल्या नाही आणि ऐकल्याही नाही, म्हणून या प्रश्नाला भेडसावू लागला आणि म्हणून त्यांनी शनाया यांच्याशी मैत्री केली आणि ती मैत्री राधिका सुभेदार यांना खटकली आणि त्याने त्या गुरुनाथवर संशय घेऊ लागल्या.
दरम्यान देसाई वकिलांना मध्येच थांबवत राधिकाच्या वकील मध्येच बोलू लागल्या, परंतु त्याने देसाई वकिलांवर त्यांच्या बोलण्याचा मुळीच फरक पडला नाही.
कोर्टात दोन्ही वकिलांचे आरोप प्रत्यारोप चालूच राहिले. पॅरानुईयाने ग्रस्त असलेली व्यक्ती संशयीत असते ज्याने राधिका सुभेदार ग्रस्त आहेत असे त्या समजू लागल्या असं त्यांनी आभासी जग निर्माण करू लागल्या. देसाई वकिलांनी पॅरानुईयाने या मानसिक रोगाने राधिका सुभेदार ग्रस्त आहेत असे ठोस मत कोर्टापुढे मांडले.
दरम्यान राधिकाच्या वकिलांनी शनायावर उडवलेल्या पैशांच्या पुरावे कोर्टापुढे सादर केले. पुढे देसाईं वकिलांनी गुरुनाथ सुभेदारांना प्रश्न विचारण्यासाठी कोर्टापुढे बोलावण्याची मागणी न्यामूर्तींकडे केली.
ज्यात राधिकेने केलेले सर्व आरोप हे खोटे आहेत असे ठोसपणे सांगितले व त्यानेही पुन्हा राधिकाला गांवढळ पणाचा लेबल लावला आणि तिच्या वागणुकीवरही बोट उगारले, हे सांगताना पुढे गुरुनाथ म्हणाले की, दिवसेंदिवस तिची वागणूक बिघडत गेली आणि माझी खूपच बदनामी केली.
बोलता बोलता आपली बायको अशी संशयीत वृत्तीने का वागते, याची दोन कारणे सांगितली, त्यात पाहिलं म्हणजे राधिकाला त्यांची प्रगती खटकते आणि दुसरं म्हणजे राधिकाच्या डोक्यावर परिणाम झाला असावा. गुरुनाथच्या अशा बोलण्याने स्वतःला सावरून राधिका पुढलं पाऊल हिमतीने उचलेल का?