मुंबई : 'माझ्या नवऱ्याची बायको' या झी मराठीवरील लोकप्रिय मालिका आता एका महत्त्वाच्या आणि नव्या टप्प्यावर येऊन पोहचली आहे. आर्थिक संकटामुळे गुरु-शनाया पुरते त्रासून गेले आहेत. तर राधिका यशाचे एक एक शिखर चढत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुच्या एएलएफ कंपनीचे बॉस कंपनी विकायला निघाले आहेत आणि त्यासाठी आयोजित केलेल्या मिटींगमध्ये राधिका अधिक बोली लावून कंपनी विकत घेते. आता राधिका एएलएफची नवी बॉस होणार आहे. तरीही देखील तिचा विनम्रपणा कायम आहे. कंपनीतील जुन्या बॉसना ती अॅडव्हाजर म्हणून कंपनीत काम करण्यासाठी विचारते. कंपनीचे दोन्हीही बॉस अगदी हसत हसत या ऑफरचा स्वीकार करतात.


या यशानंतर राधिका मसालेमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. हा आनंद सगळेजण मिळून साजरा करत आहेत. ही आनंदाची बातमी राधिका फोन करुन सौमित्रला देते आणि नेहमीप्रमाणे त्याचे आभारही मानते.


तर एकीकडे गुरु-शनाया नव्या बॉसला इंप्रेस करण्याच्या तयारीत आहेत. कारण त्यामुळे त्यांचे आर्थिक संकट दूर होईल. त्याचबरोबर नव्या बॉसला कोर्ट केसही मागे घेण्याची विनंती करु, असे मनसुबे दोघेही रचत आहेत. पण पुढे काय होणार, याची कल्पना दोघांनाही नाही. 


आता राधिका गुरु शनायाची नवी बॉस होणार आहे. आता खरी गंमत येणार आहे. आता पुढे नेमके काय काय होते, हे पाहणे खरंच औत्सुक्याचे ठरणार आहे. राधिका तिच्या इच्छेनुसार, गुरु-शनायाला तिच्या ऑफिसची टेबलं पुसायला लावणार का? हे पाहण्यासाठी पाहात राहा, माझ्या नवऱ्याची बायको.