मुंबई : झी मराठी वरील लोकप्रिय मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' यात नवनवी रंजक वळणं पाहायला मिळत आहेत. सहनशक्तीचा अंत झाल्यानंतर राधिका गुरुनाथकडे घटस्फोट मागते. त्यानंतर कोर्टात केस उभी राहते आणि राधिका-गुरुनाथच्या घटस्फोटाचा महासंग्राम कोर्टात चांगलाच रंगतो. पण बिनडोक शनाया मध्येच पचकते आणि घटस्फोटाचा निर्णय जवळजवळ राधिकाच्या बाजूने लागणार, हे लक्षात येताच गुरुनाथ आजारी पडल्याचे खोटे नाटक करतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे नाटक सर्वांच्या जरी लक्षात आले असले तरी गुरुनाथच्या आईचे पुत्रप्रेम मात्र फारच उफाळून येते. गुरुनाथ नेहमीच नाटक करणार नाही, असे त्यांना वाटू लागते आणि मुलाच्या काळजीने त्या व्याकूळ होतात. 
राधिका मात्र गुरुनाथच्या या खोटेपणाला चांगलीच ओळखून असल्याने ती त्याला चांगलेच खडे बोल सुनावते. पण गुरुनाथच्या या खोटेपणामुळे त्याचे बाबा, रेवती चांगलेच संतापतात. पण आई पुन्हा एकदा राधिकाला केस मागे घेण्याची विनंती करते.


आता खटल्याला पुढची तारीख मिळाली असून गुरुनाथच्या बाबांना मात्र त्यादरम्यान नागपूरला जावे लागणार आहे. त्याचाच फायदा घेऊन मानसिक व्दंव्दात असलेल्या आईचे मन आपल्या बाजूने वळवण्यात गुरुनाथ यशस्वी होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जर तसे झालेच तर घटस्फोटाची केस चांगलीच रंगेल, यात वाद नाही.