मुंबई : मालिकांच्या शूटिंगसाठी कलाकारांना १६-१७ तास एकत्र काम करावे लागते. त्यामुळे टी.व्ही. मालिकातील कलाकार मालिकेच्या सेटपेक्षा घरात अधिक वेळ घालवतात. त्यामुळे एखाद्या सहकलाकाराशी जवळीक होणे अगदी स्वाभाविक आहे. शूटिंग नसताना धमाल मस्ती करत असतात. या धमाल मस्तीचे किस्से, फोटोज, व्हिडिओज ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.


चकीत करणारा व्हिडिओ आला समोर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील जेनीची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री शर्मिला राजारामने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ मेकअपरुमधील असून त्यात अभिनेता अभिजीत खांडकेकर चक्क एका अभिनेत्रीला किस करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहुन नक्कीच तुम्हाला धक्का बसेल.




पण हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की, तो किस करत नसून फक्त एका विगसोबत मस्ती करत आहे आणि शर्मिला तेथे उभी आहे. शर्मिलाची उंची कमी असल्याने नक्की काय सुरु आहे ते आपल्या लक्षात येत नाही. पण नंतर जोरजोरत हसत अभिजीत आणि शर्मिला प्रेक्षकांसमोर येतात आणि ही सगळी गंमत उघड होते. सोशल मीडियावर या व्हिडिओ चांगलाच हिट झाला आहे.


मालिकेला रंजक वळण


माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका अत्यंत लोकप्रिय असून त्यातील सर्व व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावतात. मालिकेत आता छानसा ट्विस्ट आलेला असून मालिका अधिक रंजक झाली आहे.