मुंबई : पुन्हा एकदा मराठी सिनेसृष्टीत लग्नाची रेलचेल सुरू झाली आहे. गायिका सावनी रविंद्रच्या पाठोपाठ आता आणखी एक मराठमोळा अभिनेता बोहल्यावर चढला आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सचिन देशपांडे नुकताच विवाह बंधनात अडकला आहे. सचिनने आपल्या लग्नाचे फोटो शेअर करून ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका गेले कित्येक महिने टीआरपीमध्ये नंबर 1 वर आहे. या मालिकेच्या माध्यमातून सचिन देशपांडे प्रेक्षकांट्या घराघरात पोहोचला. या मालिकेत अनेक चढउतार आले आणि या चढउतारांना खास वळण देण्याच काम सचिन देशपांडेने देखील मालिकेत श्रेयसच्या भूमिकेत साकारली आहेत. आता या सचिनच्या खऱ्या खुऱ्या आयुष्यात सुंदर वळण आलं आहे. पियुषा बिन्दुरसोबत सचिन देशपांडे विवाहबंधनात अडकला आहे. 



सचिनने लग्नात घेतलेला उखाणा 


लग्नातील उखाणा हा कायमच खास असतो. आपल्या लग्नात देखील सचिनने असा खास उखाणा घेतला आहे.


आमच्या नात्याची गाठ 
देवानेच कुठेतरी बांधली असेल
पियूषाला सुखात ठेवण्यासाठी
मला जन्मायची संधी दिली असेल...


सचिनच्या या पोस्टवर त्याच्या फॅन्सनी खूप साऱ्या लाईक्स आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत. सचिनची ही पोस्ट हजाराहून अनेकांनी लाइक केली आहे. सचिनच्या पत्नीचे नाव पियुषा बिद्नुर असून तिचा चित्रपटसृष्टी आणि अभिनयाशी काहीही संबंध नाही. 


माझ्या नवऱ्याची बायकोच्या सेटवर खाल केळवण


सचिन आणि पियुषाला माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या सेटवर खास केळवण देण्यात आलं. यावेळी राधिका सुभेदार, गुप्ते भाऊ आणि रेवती यांच्यासोबतचे खास फोटो पियुषाने शेअर केले आहेत.