COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मुंबई : झी मराठीच्या "माझ्या नवऱ्याची बायको" या लोकप्रिय मालिकेची गुरूपासून झाली. गुरुनाथ शनायाचा राग घालविण्यासाठी तिला फुलांचा बुके पाठवतो आणि त्यासाठी शनाया रिटर्न गिफ्ट म्हणून निवडुंग पाठवते. दरम्यान, राधिकाचं मन हलकं व्हावं यासाठी सौमित्र राधिकाला दिव्यांग मुलांच्या शाळेत घेऊन जातो आणि तिथल्या दिव्यांग मुलांना पाहून राधिकाला नवीन ऊर्जा मिळते आणि राधिका पुन्हा कंपनीत कामासाठी जायचं ठरविते.


दरम्यान, आपली बॉस पुन्हा कंपनीत येणार हे ऐकून सारेजण फार खुश झाले. नंतर, सौमित्र सोबत राधिकाचं अचानक बाहेर जाणं सरीताला पसंत पडत नाही, त्यामुळे तिची नाराजी सरीता गुरुनाथ जवळ शेअर करते आणि त्यात गुरुनाथ अधिक भर घालतो. राधिका पुन्हा कामावर रुजू होणार हे ऐकल्यावर गुरुनाथची काय प्रतिक्रिया असेल हे बघण्यासाठी "माझ्या नवऱ्याची बायको" या मालिकेचा पुढील एपिसोड बघायला विसरू नका.