...तर `ऑस्कर` सोहळ्यात 17 वेळा `नाटू नाटू`वर नाचणार राम चरण आणि Jr NTR; RRR च्या अभिनेत्याचा दावा
८० व्या `गोल्डन ग्लोब्स 2023` पुरस्कार सोहळ्यामध्ये `आरआरआर` (RRR) चित्रपटातील `नाटू नाटू` (Natu Natu) गाण्याला `बेस्ट ओरिजनल साँग-मोशन पिक्चर` हा पुरस्कार पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली
Ram Charan Jr NTR Will Dance to Naatu Naatu at Oscars: अमेरिकेतील कॅलिफॉर्नियामध्ये बुधवारी पार पडलेल्या ८० व्या 'गोल्डन ग्लोब्स 2023' पुरस्कार सोहळ्यामध्ये (golden globes 2023 award) एसएस राजमौलींच्या 'आरआरआर' (RRR) चित्रपटातील 'नाटू नाटू' (Natu Natu) गाण्याला 'बेस्ट ओरिजनल साँग-मोशन पिक्चर' कॅटेगरीमधील पुरस्कार पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या गाण्याचं संगीत फारच भन्नाट असून ते ऐकताच पाय थिरकायला लागतात अशी चर्चा या पुरस्कार सोहळ्यानंतर सोशल मीडियावर सुरु होती. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि न्युनिअर एनटीआरवर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्याने 'गोल्डन ग्लोब्स' पुरस्कार सोहळ्यात अनेक आंतरराष्ट्रीय गायक आणि गितकारांना धोबपछाड देत पुरस्कारावर नाव कोरलं. टेलर स्विफ्टचं 'कॅरोलिना', ग्रेगोरी मानचं 'चाओ पापा', लेडी गागाचं 'होल्ड माय हॅण्ड'बरोबरच 'ब्लॅक पँथर: वकांडा फॉरएव्हर' चित्रपटातील 'लिफ्ट मी अप' सारख्या गाण्यांशी स्पर्धा असताना या गाण्याने पुरस्कार पटकावला.
ऑस्करमध्येही नामांकन
'नाटू नाटू' या गाण्याला सर्वोत्तम मूळ गाणं (ओरिजनल स्कोअर) कॅटेगरीत 'ऑस्कर' (Oscars) म्हणजेच अकादमी पुरस्कार सोहळ्यासाठीही शॉर्टलिस्ट करण्यात आलं आहे. या गाण्यावर होत असलेला कौतुकाचा वर्षाव, नुकताच मिळालेला 'गोल्डन ग्लोब्स 2023' पुरस्कार आणि 'ऑस्कर'मधील शॉर्टलिस्टेड यादीत झालेली निवड या सर्वांच्या पार्श्वभूमीवर अभिनेता राम चरणने एक मोठं विधान केलं आहे. जर या गाण्यासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला तर मी आणि ज्यूनिअर एनटीआर या गाण्यावर ऑस्करच्या मंचावर नाचू, असं राम चरणने म्हटलं आहे.
...तर 17 वेळा या गाण्यावर डान्स करु
मूळ तेलगू भाषेत असलेल्या 'नाटू नाटू'ला संगीत दिग्दर्शक एमएम केरावनी यांनी संगीत दिलं आहे. 'नाटू नाटू' चा अर्थ नाचणे असा होतो. हे गाणं काल भेरव आणि राहुल सिप्लिगुंज यांनी गायलं आहे. एका मुलाखतीमध्ये राम चरणला ऑस्करमध्ये 'नाटू नाटू' गाण्याला मानांकन मिळालं तर या गाण्यावर डान्स करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना राम चरणणने, "नक्कीच! ते आम्हाला पुरस्कार देणार असतील तर का नाही? आम्ही या गाण्यावर एकदा नाही तर 17 वेळा डान्स करु," असं उत्तर दिलं.
'आरआरआर'चा एक पुरस्कार हुकला
'गोल्डन ग्लोब्स 2023' पुरस्कार सोहळ्यामध्ये दोन कॅटेगरींमध्ये नामांकन मिळणं हे एखाद्या स्वप्नाप्रमाणे होतं, असंही राम चरण म्हणाला. 'गोल्डन ग्लोब्स' पुरस्कार सोहळ्यामध्ये 'पिक्चर नॉन इंग्लिश' कॅटेगरीमध्येही नामांकन मिळालं होतं. मात्र अर्जेंटीनामधील 'अर्जेंटीना १९८५' या चित्रपटाने हा पुरस्कार पटकावला.