#MeToo च्या आरोपानंतर सुहेल सेठ १८ वर्ष लहान गर्लफ्रेंडसोबत विवाह बंधनात
#MeToo मोहिमेंतर्गत तब्बल पाच महिलांनी सुहेल सेठवर लैंगिक शोषणाचे जाहीरपणे आरोप केले होते
नवी दिल्ली : जाहिरात क्षेत्रातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि सिने अभिनेता सुहेल सेठ अत्यंत खासगीपणे विवाह बंधनात अडकलाय. ५५ वर्षीय सुहेलनं ३७ वर्षीय मॉडेल लक्ष्मी मेनन हिच्यासोबत विवाह केलाय. लक्ष्मी आणि सुहेल वर्षभरापासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते... या दोघांचा गुपचूपपणे पार पडलेला विवाहही चर्चेत आलाय... त्याचं कारण म्हणजे या दोघांच्या वयात जवळपास १८ वर्षांचं अंतर आहे...
इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वीच #MeToo मोहिमेंतर्गत तब्बल पाच महिलांनी सुहेलवर लैंगिक शोषणाचे जाहीरपणे आरोप केले होते. या महिलांमध्ये मॉडेल डियान्ड्रा, लेखिका इरा त्रिवेदी, पत्रकार मंदाकिनी गेहलोत आणि लेखिका इशिता यादव यांचा समावेश आहे. मी टू अंतर्गत नाव आल्यानंतर सुहेलला टाटा ग्रुपनं कन्सल्टंट पदावरून हटवलं होतं.
सुहेल गोल्फ कोर्सस्थित मग्नोलियाज सोसायटीमध्ये राहतात. त्यांचा विवाह याच सोसायटीत पार पडला. या विवाहासाठी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित प्रफुल्ल पटेल, अमर सिंह, सिनेनिर्माते मुजफ्फर अली यांच्यासहीत २५ जण उपस्थित होते... अत्यंत खासगीपणे हा सोहळा पार पडला.
सुहेल आणि लक्ष्मी दीर्घकाळ एकमेकांसोबत नात्यात होते. त्यानंतर दोघांनीही याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात साखरपुडा केला होता. त्यानंतर लगेचच हे दोघे सुट्टी व्यतीत करण्यासाठी बाहेर गेले होते... आता मात्र अचानक त्यांनी विवाह केल्याचं समोर आल्यानं अनेकांना आश्चर्य वाटतंय.
सुहेलचा यापूर्वी १९८९ मध्ये संध्या यांच्याशी विवाह झाला होता. दोघांचं नातं केवळ चार वर्ष टीकलं... घटस्फोटानंतर दोघे वेगळे झाले. तर २०११ मध्ये लक्ष्मी मेनन ही Pirelli कॅलेंडरवर दिसलेली पहिली भारतीय मॉडेल ठरली होती. लक्ष्मीचे पार्टनर प्रबुद्धा दासगुप्ता यांचं निधन झालंय. प्रबुद्धा फोटोग्राफर होते.