शाहिद कपूरच्या पत्नीला एअरपोर्टवर अडवलं; बॅगेत अशी वस्तू सापडली की...
मीराने एक फोटो पोस्ट केला आणि सांगितलं की विमानतळावर चेकिंग दरम्यान एका सुरक्षा रक्षकाने तिला थांबवलं.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि त्याची पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput) या जोडीकडे 'मोस्ट हॅपनिंग कपल' म्हणून पाहिलं जातं. काही वर्षांपूर्वी अनेक महिला चाहत्यांची मनं तोडत शाहिदनं मीराशी लग्न केलं आणि पाहता पाहता तिलाही चाहत्यांनी आपलंसं केलं. आज मीरा अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या मात्र फार मोठी आहे. मीराच्या प्रत्येक पोस्टकडे चाहत्यांचं लक्ष असतं. आता देखील मीराने एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून सोशल मीडियावर फक्त आणि फक्त मीराच्या नव्या पोस्टची चर्चा आहे.
यावेळी मीराने एक फोटो पोस्ट केला आणि सांगितलं की विमानतळावर चेकिंग दरम्यान एका सुरक्षा रक्षकाने तिला थांबवलं. त्यानंतर तिच्या बॅगेतून काहीतरी बाहेर आले जे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले.
या दरम्यान मीरा राजपूतची पोस्ट व्हायरल होत आहे, जी तिने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केली आहे. वास्तविक, मीराने शेअर केलेल्या फोटोमध्ये एक पॅकेट दिसत आहे आणि त्यामध्ये कोबीचे सलगम लोणचं दिसत आहे. या फोटोसोबत तिने एक किस्साही शेअर केला आहे.
मीरा ख्रिसमस साजरा करण्यासाठी तिच्या आईला भेटायला जात होती, तेव्हा तिला विमानतळावर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी थांबवलं आणि तिची बॅग तपासली. मीराच्या बॅगेत काचेचं भांडं सापडलं. जेव्हा ती बरणी उघडली तेव्हा सुरक्षा लोकांना त्यात कोबी सलगम लोणचं सापडलं.
यानंतर मीराला जाण्याची परवानगी देण्यात आली. हाच किस्सा सांगताना मीरा म्हणाली की, जेव्हा तुम्हाला विमानतळावर घरी बनवलेलं अन्न घेतल्याबद्दल सुरक्षा रक्षकाकडून थांबवलं जातं. या पोस्टमध्ये तिने असंही सांगितलं आहे की, कोबी म्हणजे सलगम नावाचं लोणचं. हे पाहून लोकांना तुम्ही पंजाबी असल्याची कल्पना येते.
मीरा पुढे म्हणाली की शेवटी त्यांनी मला जाऊ दिलं, पण हे पाहून तेथील कर्मचारी हसू लागले आणि मला जाऊ द्या म्हणाले. मीराची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मीराने शेअर केलेल्या फोटोत एक पॅकेट दिसत आहे, जे प्लास्टिकने भरलेले आहे आणि त्याच्यात तेच लोणचे आहे.