Bollywood News: हृतिक रोशन सध्या त्याच्या फायटर या चित्रपटात व्यस्त आहे. दीपिका पादुकोणसोबत तो या चित्रपटात जिसत आहे. हृतिक रोशनने आजपर्यंत बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले. मात्र, 2010मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या एका चित्रपटाने मात्र प्रेक्षकांना निराश केले. हा चित्रपट बॉक्सऑफिसवर सपशेल आपटला. या चित्रपटाच्या माध्यमातून एका नवोदित अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, पहिलाच चित्रपट सुपरफ्लॉप ठरल्याने पुढे या अभिनेत्रीला काम मिळणेच कठिण झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2010 साली हृतिक रोशनची मुख्य भूमिका असलेला काइट्स हा चित्रपट रिलीज झाला होता. अनुराग बसू हा या चित्रपटाचा दिग्दर्शक होता तर, चित्रपटाची कथा आणि निर्माते हे राकेश रोशन होते. तर, चित्रपटात हृतिक रोशन, बार्बरा मोरी, कंगना रणौट आणि कबीर बेदी यांच्या मुख्य भूमिका होत्या. काइट्स चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जेमतेम 48.56 कोटींचा गल्ला जमावला होता. तरर, चित्रपटाचे एकूण बजेट 82 कोटी इतके होते. त्यामुळं या चित्रपटामुळं 40 ते 45 कोटींचे नुकसान सहन करावे लागले होते. 


काइट्स हा हृतिक रोशनचा सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा ठरला होता. या चित्रपटाच्या दरम्यानच हृतिकचे बार्बरा मोरीसोबत अफेअर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. तसंच, बार्बरामुळेच हृतिक आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सुझेन खान यांच्यातील अंतर वाढले, अशाही चर्चा आहेत. दरम्यान, चित्रपटातही बार्बरा मोरी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवू शकली नाही. त्यामुळं या चित्रपटानंतर तिला बॉलिवूडमध्येही काम मिळेनासे झाले. तिच्या अभिनयाऐवजी तिच्या खासगी आयुष्याचीच जास्त चर्चा होती. काइट्स चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान हृतिक ने बार्बराला 2 कोटींची व्हॅनिटी व्हॅन गिफ्ट केली होती. 


मॅक्सिकन अभिनेत्री असलेल्या बार्बरला बॉलिवूडमध्ये मात्र आपली ओळख निर्माण करता आली नाही. काइट्स फ्लॉप झाल्यानंतर तिला बॉलिवूडमध्ये कधीच काम मिळाले नाही. त्यानंतर बार्बरा मोरीला कर्करोगाने ग्रासले. बार्बराला स्तनाचा कर्करोग असल्याचे समोर आले. मात्र, उपचारांनंतर ती त्यातून बरीदेखील झाले. कर्करोगावर मात केल्यानंतर बार्बराने कर्करोगग्रस्तांसाठी हेल्थ चेकअप आणि इतर समाजिक कार्यांत गुंतली. 


बॉलिवूडमध्ये जरी बार्बरासाठी काम मिळेनासे झाले तरीदेखील तिच्या देशात ती आजही सिनेमांत काम करते. अलीकडेच तिचा Perdidos en la noche हा सिनेमा रिलीज झाला आहे. बार्बराच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, बार्बराचे दोनदा लग्न झाले आहे. 1996 मध्ये बार्बराल अभिनेत्रा Sergio Mayerसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्या दोघांना 1998मध्ये एक मुलगा झाला. मात्र, त्यानंतर दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 2016मध्ये तिने बेसबॉल प्लेअर असलेल्या  Kenneth Ray Sigman सोबत लग्न केले. मात्र, एक वर्षांच्या संसारानंतर ते वेगळे झाले. 


दरम्यान, बार्बरा मोरीच्या मुलाला एक मुलगीदेखील आहे. नोव्हेंबर 2016मध्ये तो एका मुलीचा बाप झाला. विशेष म्हणजे, वयाच्या 38व्या वर्षीच अभिनेत्री आजी झाली होती.