मुंबई : एका नागा साधूचा लूक हा कायमच वेगळा असतो. 'लाल कप्तान' सिनेमातील सैफ अली खानचा लूक अतिशय हटके आहे. सिनेमातील ट्रेलरने सैफ अली खानची भूमिका स्पष्ट केली आहे. यामधील सैफचा लूक हा त्याच्या भूमिकेला अधोरेखित करत आहे. हा सिनेमा 18 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैफच्या 'नागा' साधूच्या भूमिकेमागे आणखी एका व्यक्तीची मेहनत आहे. आणि तो व्यक्ती म्हणजे दर्शन येवलेकर. दर्शनने या अगोदर 'पद्मावत' या सिनेमातील अलाउद्दीन खिलजीला म्हणजे रणवीर सिंहवर मेहनत घेतली आहे. 'पद्मावत'मध्ये खिलजीच्या रुपात रणवीर सिंह प्रेक्षकांना भरपूर आवडला. त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या लूकने देखील प्रेक्षकांच कौतुक मिळवलं होतं. 



'लाल कप्तान'बाबत दर्शनने एक मुलाखत दिली. यामध्ये तो म्हणाला की,'नागा साधू हे सामान्य व्यक्ती असतात. ज्यांनी जीवनात सर्वच गोष्टींचा त्याग केलेला असतो. स्वतःला कायम राखेने माखवून ही व्यक्ती केस आणि दाढी कधीच कापत नाही.या नागा साधूंना बघून सिनेमाच्या 'नागा'साधूच्या लूकची प्रेरणा मिळाली.'



पुढे दर्शन म्हणाला की, 'या लूककरता भरपूर मेहनत घ्यावी लागली आणि भरपूर वेळ देखील गेला. फर्स्ट लूक करण्याकरता दोन तास लागले. हा लूक फक्त दिग्दर्शक आणि निर्माता टीमलाच नाही तर सैफला देखील आवडला.' एवढंच नव्हे तर सगळ्यांना माहित होतं की, आपण जे करतोय ते सगळ्यांच्याच कम्फर्ट झोनच्या बाहेरचं आहे. दररोज मी नवीन लूक करायचो आणि त्यानंतर त्यामध्ये सूचनेनुसार बदल करायचो.