मुंबई : साऊथचे सुपरस्टार ममूटीने स्वतःला फक्त मल्याळम सिनेमा इंडस्ट्रीमध्येच बिझी ठेवलं आहे. पण असं असलं तरीही ममूटी हे संपूर्ण देशभरात लोकप्रिय आहेत. ममूटी यांच्या प्रत्येक गोष्टीवर मीडिया आणि चाहत्यांच लक्ष असतं. नुकत्याच एका मुलाखतीत ममूटी यांनी चक्क बॉलिूडचा दबंग खान सलमान खानबाबत एक वक्तव्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खानसोबत काम करण्यावरून ममूटी यांना प्रश्न विचारण्यात आले. त्या प्रश्नावर त्यांनी दिलेलं उत्तर हे सलमान खानच्या आणि बॉलिवूडच्या सगळ्या प्रेक्षकांसाठीच धक्कादायक आहे. 


ममूटी यांनी मुलाखतीत सांगितलं की, मला नाही वाटतं, सलमान खान कधी मल्याळम सिनेमा करेल. त्याच्यासाठी ही खूप कठीण भाषा आहे. महत्वाचं म्हणजे सलमान खानसारख्या सुपरस्टारला आम्ही मल्याळण सिनेमात अफोर्ड करू शकत नाही. त्यामुळे आम्ही सलमान खानसोबत कोणता मल्याळम सिनेमा करू शकत नाही. पण मी सलमानसोबत कोणता हिंदी सिनेमा करू हे जास्त सोपं असेल. 


सलमान खानने देखील अनेकदा साऊथच्या अभिनेत्यांसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच अभिनेता ममूटी यांनी बॉलिवूडकडून कोणतीही ऑफर न मिळाल्यामुळे निराशा व्यक्त केली. ते म्हणाले की, याबद्दल मला फार विचार करण्याची गरज नाही. खूप अगोदर मला बॉलिवूडची ऑफर मिळाली होती. पण आता मला कोणतीही ऑफर मिळालेली नाही. जर कोणता चांगला प्रोजेक्ट माझ्याकडे आला तर मी काम करण्यास तयार आहे. 


साऊथ सुपरस्टार ममूटी सध्या आगामी सिनेमा 'ममांगम' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ममूटी यांचा हा सिनेमा 31 ऑक्टोबर रोजी सिनेमाघरात प्रदर्शित होणार आहे. तर सलमान खान 'दबंग 3' च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रभूदेवा करत आहेत.