अभिनेत्री श्रीदेवीचे पार्थिव भारतात आज दुपारी दाखल होणार
अभिनेत्री श्रीदेवी यांचं पार्थिव आज विशेष विमानानं भारतात आणलं जाणार आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत त्यांचं निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या.
मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांचं पार्थिव आज विशेष विमानानं भारतात आणलं जाणार आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत त्यांचं निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या.
आनंदाच्या क्षणी मृत्यू
आपल्या कुटुंबीयांसह श्रीदेवी त्यांच्या भाच्याच्या लग्नासाठी दुबईला गेल्या होत्या. त्यांच्याबरोबर त्यांचे पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी होते. दुबईमध्ये जुमैरा एमिरेटस् हॉटेल्समध्ये श्रीदेवी आणि त्यांचं कुटुंब थांबलं होतं. तेव्हा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालं.
बॉलिवूडची 'चांदणी' हरपल्याची भावना
श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांनी अभिनयाची सुरुवात लहान असतानाच सुरु केली होती. 1978 साली सोलहवाँ सावन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केले आहे. बॉलिवूडमधील सदमा, नगिना, निगाहें, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गावाह, जुदाई अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.