मुंबई : अनेकदा आयुष्यात अशा काही अनपेक्षित घटना घडतात ज्या सारं चित्रच बदलून जातात. अभिनेता चिरंजीवी सारजा यांच्या खासगी आयुष्यात असंच वादळ आलं. चिरंजीवी आणि त्याची पत्नी मेघना राज त्यांच्या बाळाचं स्वागत करण्यासाठी सज्ज होत असतानाच काळानं घाला घातला. ७ जून २०२० ला चिरंजीवींचा कार्डिऍक अरेस्टमुळं मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाक्षिणात्य कलाविश्वात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या या अभिनेत्याच्या निधनामुळं सारं कलाविश्व हळहळलं. इथं त्याच्या पत्नीलाही जबरदस्त धक्का बसला होता. पण, यातूनही सावरत अखेर तिच्याही आयुष्यानं वेग धरला. मेघनानं चिरंजीवी गेल्यापासून त्यांच्या सुरेख अशा आठवणींच्या बळावर हे जीवन जगण्यास सुरुवात केली. सध्या मेघनानं पुन्हा एकदा लक्ष वेधलं आहे ते म्हणजे तिच्या baby shower च्या फोटोंमुळं. 


चिरंजीवी आपल्यात नसला तरीही तो मेघनाला आताही साथ देत आहे, हेच या क्षणाचा फोटो पाहून लक्षात येत आहे. baby shower च्या दिवशी एका सिंहासनावर बसलेल्या मेघनाच्या मागे चिरंजीवी दिसत आहेत. अर्थात तो त्यांचा फोटो असल्याचं पुढं लक्षात येत आहे. 




 


चिरंजीवी आणि मेघनाचं नातं होतं खास... 


लग्नापूर्वी जवळपास १० वर्षांपासून ते एकमेकांचे चांगले मित्र होते. काही दिवसांनी त्यांच्या प्रेमाचे  रूपांतर प्रेमात झालं आणि अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.  चिरंजीवी आणि मेघना राज यांनी २०१८ मध्ये लग्न केलं होतं.