पणजी : 'हवस' सिनेमा आणि 'कलियोंका चमन' या प्रसिद्ध गाण्यातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मेघना नायडू हिला चोरट्यांनी चांगलाच गंडा घालता. मेघनाच्या गोव्यातील घरात राहणाऱ्या भाडेकरुंनी तिच्या घरातून तिच्या अंडरविअरसह अनेक गोष्टीही चोरुन पळ काढला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेघना नायडूने फेसबुकवरुन या प्रकाराची माहिती दिली आहे. इतकेच नाहीतर भाडेकरु म्हणून राहणाऱ्या दाम्पत्याचा फोटोही तिने शेअर केला आहे. गोव्यातील कंडोलिम भागात मेघनाचा बंगला आहे. या दोन चोरट्यांनी आपण मुंबईचे रहिवासी असून न्यूझीलंडमध्ये नोकरी करत असल्याचं खोटं तिला सांगितलं. इतकेच नाहीतर त्यांनी बनावट आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स देऊन त्यांनी बंगला रेन्टवर घेतला.  



घरातील लहान-सहान गोष्टींपासून मौल्यवान वस्तू, इतकंच काय माझी अंतर्वस्त्र आणि सॉक्सही घेऊन एका रात्रीत ते पळाले, असं मेघनाने लिहिलं आहे. माझी आणि माझ्या केअरटेकर ल्यूईस यांची कपड्यांची बॅग, स्पीकर त्यांनी पळवला. माझ्या केअरटेकरला ८५ हजारांचा तर आणखी एका महिलेला ४० हजारांचा गंडा घातला, असा दावाही मेघनाने केला आहे.