मुंबई : चित्रसृष्टीमध्ये ९० च्या दशकातील अनेक चित्रपट आणि त्या चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. ९०च्या दशकातील चित्रपटातील गाणी ही, ऐकायला मधुर आणि गोड, असं अनेकांचं मत. अशाच एका गाण्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. मुळात तो चित्रपट आणि त्यातील गाणी प्रेक्षकांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये आजही कायम आहे. तो चित्रपट म्हणजे 'साजन'. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'साजन'मधील अशाच लोकप्रिय गाण्याचं नवं रुप प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ९०च्या दशकात त्यावेळी तांत्रिक गोष्टाचा जरी अभाव असला. तरी ९० च्या दशकातील आजही गाणी लोकप्रिय आहे. यावेळी देखील ९०च्या दशकातील एक सुपरहिट गाण्याचं रीमेक व्हर्जन चांगलंच गाजत आहे. या गाण्याच्या रिमेक व्हर्जनने २७ दशलक्ष व्ह्यूजचा आकडा पार केला आहे. माधुरी दीक्षित, संजय दत्त आणि सलमान खान यांच्या 'साजन' चित्रपटातील हे गाणं चित्रपटाला २७ वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने ते पुन्हा अनेकांच्याच मनाचा ठाव घेत आहे. 



 


चित्रपटाची लोकप्रियता आणि यश साजरा करण्यासाठी 'मेरा दिल भी कितना...' या गाण्याला रीक्रिएट करण्यात आलं आहे. हे गाणं ९०च्या दशकात प्रेमाच्या आणाभाका देणाऱ्यांसाठी जणू एका प्रथेप्रमाणेच होतं. आजही चाहत्यांमध्ये या गाण्याचं तितकंच वेड आहे.  


 


 



यूट्यूबवर या गाण्याला मिळणारी लोकप्रियता पाहता गाण्याचे निर्माते वीरल मोटवानी यांनी या गाण्यातील खरेपणाचे भाव अधोरेखित केले. 'मला वाटलं नव्हतं की, या गाण्याला इतकी जास्त पसंती दिल्याबद्दल मी चाहत्यांचा आभारी आहे. हे यश माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे जे मी शब्दात व्यक्तही करू शकत नाही आहे', असं वीरल म्हणाले.