Bhau Dooj Wishes in Marathi : ओवाळीते भाऊराया...भाऊबीज निमित्त भावा-बहि‍णींना द्या खास मराठीतून शुभेच्छा

Bhau Beej Wishes 2024 in Marathi : दिवाळी पाडव्यानंतर बहीण भावाच्या प्रेमाचा सण म्हणजे भाऊबीज. 3 नोव्हेंबरला भाऊबीज साजरी करण्यात येणार आहे. लाडक्या भावाला ओवाळण्यासाठी 11 वाजून 46 मिनिटांपर्यंत सर्वोत्तम मुहूर्त आहे. त्याशिवाय पहिला मुहूर्त सकाळी 07 वाजून 57 मिनिटांपासून ते 09 वाजून 19 मिनिटांपर्यंत त्यानंतर दुसरा मुहूर्त सकाळी 09.20 ते 10.41 वाजेपर्यंत त्यानंतर 10 वाजून 41 मिनिटांपासून दुपारी 12 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे. अशा या शुभ दिनाचे भाऊबीजेला बहीण भावाला द्या खास मराठीतून शुभेच्छा 

| Nov 02, 2024, 22:05 PM IST
1/7

आली आज भाऊबीज ओवाळते भाऊराया राहू दे रे नात्यामध्ये स्नेह, आपुलकी माया भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!  

2/7

वाट नवी, नव्या दिशा मिळो तुझ्या कर्तृत्वाला धन संपदा आणिक यश, कीर्ती लाभो भाऊराया तुला… भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा..!  

3/7

व्हावे तू रे दीर्घायुषी हीच आस माझ्या मनी बहीण भावाचे नाते अखंडीत जन्मोजन्मी… भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा..!  

4/7

नाते भाऊ बहिणीचे नाते पहिल्या मैत्रीचे बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!  

5/7

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण, लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे बहीण भावाचा पवित्र सण.. भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!  

6/7

जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे! भाऊबीजनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा…!  

7/7

सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहिणीची वेडीही माया... भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा