Actress Anaya Soni On Her Kidney Failure : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अनाया सोनी ( Anaya Soni ) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अनायानं 'मेरे साई' या मालिकेतून प्रेक्षकांनी मने जिंकली. अनाया गेल्या दोन वर्षांपासून डायलिसिसवर होती. अनायानं तिच्या किडनी फेल्युअरची बातमी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितली होती. त्यानंतर तिच्या त्रासात वाढ झाली आहे. तिच्या या आजारपणामुळे अनेक प्रोजेक्ट्स तिच्या हातातून बाहेर गेले. सतत डायलिसिसचा खर्च आणि कामाच्या अडचणीमुळे तिला अनेत गोष्टींचा सामना करावा लागत आहे.


पाहा काय म्हणाली अनया -


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनयानं नुकतीच आजतकला मुलाखत दिली होती. या दरम्यान ती म्हणाली, 'मी दोन दिवसांपूर्वीच 'मेरे साई' या मालिकेच्या शूटिंगवरून परतली. डायलिसिसमुळे मला नियमित काम करता येत नाही. ज्या दिवशी डायलिसिस होतं, त्या दिवशी सेटपर्यंत पोहोचणे कठीण होतं. मला आठवड्यातून तीनदा डायलिसिससाठी जावे लागते. एकूण, मी एका महिन्यात 12 दिवस डायलिसिसवर घालवते. जोपर्यंत किडनी मिळत नाही तो पर्यंत हे असच सुरु राहणार. प्रत्येक सेशनचे पंधराशे रुपये लागतात. त्याशिवाय गोळ्यांचा खर्च तो वेगळा असतो.' 


अनया पुढे म्हणते, 'हा फक्त माझा वैद्यकीय खर्च आहे, त्याशिवाय घराचं भाडं आणि इतर अनेक खर्च होत आहेत, तर माझ्या वैद्यकीय स्थितीमुळे उत्पन्नही खूप कमी झालं आहे. पूर्वी मी मालाडला राहायचे. तेथील भाड्याचे पैसे वाचवण्यासाठी मी नुकतेच घरही शिफ्ट केले. आम्ही हॉस्पिटलजवळ घर घेतले आहे. जेणेकरून माझा प्रवास खर्चही वाचेल. दिवस खूप कठीण जात आहेत. माझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्याची माहिती मी सोशल मीडियावर सांगितल्यापासून संघर्ष सुरू झाला आहे. खरंतर मला माझ्या उपचारासाठी निधी उभारायचा होता, पण त्या पोस्टमुळे माझ्या अडचणीत वाढ झाली आहे. आता मी कोठेही ऑडिशनला जातो किंवा काम मागते, तेव्हा माझ्या वैद्यकीय स्थितीमुळे मला नाकारले जाते. आता डायलिसिसच्या दिवशीही मी शूटिंगसाठी तयार आहे. खरंतर सेटवर माझ्यासोबत काही घडू शकते याची त्यांना भीती वाटते. कोणीही धोका पत्करू इच्छित नाही. सध्या मी छोट्या छोट्या भूमिका करून माझा उदरनिर्वाह करत आहे.'



अनया पुढे म्हणाली की, 'त्या पोस्टनंतर लोकांच्या अनेक विचित्र प्रतिक्रियाही येऊ लागल्या. अनेकांनी मला फोन करून सांगितले की तू तर खूप पैसे जमा करत आहेस... तुझ्याकडे तर खूप पैसे आले असतील... त्यांनी माझ्या परिस्थितीची चेष्टा केली. मलाही काही फरक पडत नाही, पण काम न मिळाल्यानं मला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. मात्र, लोकांनी मदत केली हे नाकारता येत नाही. सोनू सूद आणि माझ्या साईच्या सेटने मला आर्थिक मदत केली आहे.'


हेही वाचा : डेटिंगच्या चर्चांमध्येच Disha Patani नं नव्या बॉयफ्रेंडसोबत बाथरुममधील 'तो' Video Viral


2015 मध्ये माझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या. तेव्हा वडिलांनी मला एक किडनी दिली. गेल्या वर्षी ही किडनीही कोविडमुळे फेल झाली होती. यामुळे मी आता डायलिसिसवर आहे. माझ्या आईला शुगर आहे. त्यामुळे ती किडनी दान करु शकत नाही. माझी आई लहान भावाकडे अमरावतीत राहते. आर्टिफिशियल ज्वेलरी आणि कपडे भाड्याने देण्याचे काम वडील करतात. माझ्या प्रकृतीमुळे वडील येथे आले असून आई आणि भावू आमचा व्यवसाय सांभाळत आहेत.