मुंबई : महाराष्ट्रा मधील लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढविण्यात आलं आहे आणि यामुळे सोनी टीव्हीवरील मालिका मेरे साईचा सेटही महाराष्ट्रमधून गुजरात येथे हलविण्यात आला आहे. या मालिकेच्या निर्मात्यांनी उमरगावमध्ये एका आठवड्यात जुन्या शिर्डीचा सेट तयार केला आहे. आतापासून काही महिने या मालिकेचं शूट ईथूनच केलं जाईल.  साईची भूमिका साकारणारा अभिनेता तुषार दळवी सोबत संपूर्ण मालिकेची टीम गुजरातमधील उमरगाव ईथे पोहोचली आहे. तिथे कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी असल्याने संपूर्ण सावधगिरीने शूट करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेरी साई या मालिकेत लीपनंतर अभिनेता तुषार दळवी साईची भूमिका साकारत आहे. यापूर्वी अभिनेता अबीर सोफी ही व्यक्तिरेखा साकारत होता. तुषार दळवीनुसार शिर्डीच्या साईबाबांची ही भूमिका त्याच्या मनापासून अगदी जवळ आहे. तो म्हणाला, साईबाबांच्या जबाबदाऱ्या निभावल्यावर  ज्ञानाचा मार्ग सापडतो. हा कार्यक्रम नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. कारण हा शो प्रेक्षकांच्या थेट ज्वलंत प्रश्नांवर प्रकाश टाकतो. या शोचा ट्रॅक सध्या साईंची बहीण चंद्र बोरकरभोवती फिरत आहे.


या ट्रॅकबद्दल तुषार दळवी म्हणतात की, आमचा परिवार ही आमची जबाबदारी आहे, म्हणून बायको, पती किंवा मुले यांना अध्यात्माच्या शोधात सोडून जाणं योग्य नाही, कारण यामुळे दुसऱ्यांना दु: ख आणि त्रास होतो. कोणत्याही यशस्वी अध्यात्मिक प्रवासासाठी हा सर्वात वाईट अनुभव आहे. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर, हे काम नाही करणार.


जबाबदारीपासून पळून जाणं चुकीचं आहे
तुषार पुढे असंही म्हणाला की, या व्यतिरिक्त मला वाटतं कोणतंही आकर्षण शारीरिक नसतं. सगळ्या प्रकारचे मोह आपल्या मनात असतात. अशा परिस्थितीत एखाद्याला शारीरिकरित्या सोडण्याचा अर्थ असा नाही की, त्या व्यक्तीशी आपला लगाव संपेलं. सगळ्यात मोठी स्वातंत्र्यता तर सरगळ्यात मजबूत लगावा दरम्यान आढळते. अशा परिस्थितीत आपण आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढू नये कारण हा केवळ ज्ञानाचा मार्ग आहे.