मुंबई: तनुश्री दत्ता हे एकच नाव गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वात प्रचंड चर्चेत आलं आहे. बरीच वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीपासून दूर राहिलेल्या अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला होता. नानांवर तिने लैंगिक शोषणाचे आरोप केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तनुश्रीने केलेल्या या आरोपांनतर कलाविश्वात बऱ्याच प्रश्नांनी आणि चर्चांनी डोकं वर काढलं. अनेक अभिनेत्रींनी त्यांना सामोरंल जावं लागलेल्या प्रसंगाविषयी वाच्यता केली. 


एक प्रकारे तनुश्रीच्या एक धाडसी पावलामुळे अकेजणींना प्रेरणाच मिळाली. 


नानांवर आरोप केल्यानंतर असंख्य चर्चा, माध्यमांचे प्रश्न आणि त्यांना उत्तरं देण्यातून उसंत मिळाल्यानंतर तनुश्रीने नवरात्रोत्सवाचा आनंद घेतल्याचं पाहायला मिळालं.




आपल्या बहिणीसोबत तनुश्री यावेळी अगदी निवांत दिसत होती. सोशलल मीडियावर याविषयी बरेच व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. 


दरम्यान, नवरात्रोत्सवादरम्यान काही वेळासाठी का असेन, तनुश्री या साऱ्या तणावग्रस्त वातावरणापासून दूर गेली असं म्हणणं वावगं ठरणार नाही.