मुंबई :  आपल्या देशात टॅलेन्टची कमतरता नाही. अनेक ग्रामीण भागात अनेक प्रतिभावान लोक आहेत, परंतु हवी तशी संधी उपलब्धमुळे त्यांचं टॅलेन्ट जगासमोर येऊ शकत नाही. पण आता सोशल मीडियाच्या युगात सर्व काही शक्य झालं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला आपण जगाला दाखवू शकतो. असाचं एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चक्क डान्सचा देवता मायकल जॅाक्सन यांच्या सारखाचं डान्स करताना दिसत आहे. 



रस्त्यावर या व्यक्तीचा डान्स पासून जमलेले सर्व थक्क झाले आहे. त्याच्या डान्स पाहाण्यासाठी लोकांनी रस्त्यावर एकचं गर्दी केली. हा व्हिडिओ पाहून मालकल जॅक्सन अद्याप आपल्यात आहेत असा भास होत आहे. कावेरी नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.  व्यक्तीचे डान्स स्टेप्स पाहून लोक त्याच्या डान्सची स्तुती करत आहेत.