नवी दिल्ली : प्रसिध्द पंजाबी गायक मिक्का सिंहच्या मुंबई घरी चोरी झाल्याची बातमी तीन दिवसांपुर्वी माध्यमांमध्ये आली होती. हाय प्रोफाईल प्रकरण असल्याने पोलिसही याप्रकरणात अधिक लक्ष घालून होते. मिकाच्या ओशिवरा स्थित अपार्टमेंटमधून ३.२५ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची आणि रोख रक्कमेची चोरी झाली होती. या घटनेची ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये रविवारी तक्रार केली होती.गेल्या काही दिवसांपूर्वी, विमानाचा बिझनेस क्लास बुक करून श्रीमंतीचं प्रदर्शन करणारा मिका सिंग चर्चेत आला होता. परंतु, या घटनेमुळे मात्र मिकाला चांगलाच धडा मिळालाय. अखेर मिका सिंहच्या घरी चोरी करणाऱ्या आरोपीला दिल्लीतून अटक करण्यात आलंय.


लाखोंचा ऐवज 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 २९ जुलैला मिकाच्या घरी चोरी झाली होती...ओशिवारा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार होती...दिल्ली पोलिसांना मिळालेल्या सूचनेवरून त्यांनी आरोपी अंकित वासनला अटक केली..हा आरोपी मिकाकडे गेली १५ वर्ष काम करत होता...त्याच्याकडून ६९०० यूएस डॉलर, ५० हजार रोख रक्कम आणि ३ खात्यांमध्ये एकूण ५ लाख रुपये सापडले.


मिकाच्या अगदी जवळचा 


सायंकाळी ३-४ वाजल्यादरम्यान ही घटना घडली होती. यानंतर मिकाच्या घरी आल्या-गेलेल्यांची पोलीस चौकशी केली जात होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्येही ताब्यात घेतलंय. दरम्यान गेल्या १० वर्षांपासून मिकासोबत काम करणारा २७ वर्षीय अंकित वासन त्याच दिवसापासून गायब झाला होता. अंकित मिकाचे प्रोजेक्ट आणि लाईव्ह शोचं काम पाहत होता. पोलिसांना त्याच्यावर संशय असल्याने अंकितविरूद्ध कलम ३८२ नुसार गुन्हाही दाखल करण्यात आला होता. अंकित मिकाच्या अगदी जवळचा व्यक्ती म्हणून परिचित होता. त्यामुळे त्याच्या येण्याजाण्यावर कुणीही संशय घेतला नाही... आणि याचाच फायदा घेतला.