माईक टायसनने Liger चित्रपटासाठी घेतले इतके कोटी,आकडा एकूण थक्क व्हालं
संपुर्ण सिनेमा नव्हे तर केमिओ रोलसाठी...माईक टायसनने घेतले तब्बल इतके कोटी, आकडा एकूण विश्वास बसणार नाही
मुंबई : यंदाच्या वर्षातील सर्वांत हिट चित्रपटांमध्ये ज्या चित्रपटाचं नाव घेतलं जात होत, तो 'लायगर' (Liger) चित्रपट अखेर बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलाय. त्यामुळे सिनेमाच्या स्टार कास्टसह मेकर्सना मोठा धक्का बसला आहे. या चित्रपटाच्या फ्लॉप झाल्यानंतर आता या स्टार कास्टच्या मानधनाचे आकडे समोर येत आहेत. त्यात आता सिनेमात केमिओ रोलमध्ये दिसणाऱ्या महान बॉक्सिंग चॅम्पियन माइक टायसनला (Mike Tyson) देखील या सिनेमात मोठं मानधन देण्यात आलं होत. नेमकं त्याने या सिनेमासाठी किती मानधन घेतलं होतं ते जाणून घेऊयात.
'लायगर' (Liger) चित्रपट हा सर्वांत हिट चित्रपट ठरेल असा कयास आधीच लावला गेला होता. चित्रपटाच्या स्टारकास्टने देखील खुप मेहनत घेतली होती. तसेच चित्रपट हिट करण्यासाठी महान बॉक्सिंग चॅम्पियन माइक टायसनला (Mike Tyson) देखील या सिनेमात केमिओ रोल दिला होता. चित्रपटाचं प्रमोशनही भरभरून करण्यात आलं होतं. चित्रपटाच्या प्रमोशनाचे किस्से देखील समोर आले होते. मात्र इतकं करून सुद्धा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलाय.
या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये चर्चा होती, परंतु जेव्हा तो चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा त्याचा रिव्यु एकदमचं उलट आला. समीक्षक आणि चाहत्यांना कोणालाच हा सिनेमा आवडला नाही. महान बॉक्सिंग चॅम्पियन माइक टायसनची (Mike Tyson) कॅमिओ भूमिका देखील चित्रपट वाचवू शकली नाही. दरम्यान या भूमिकेसाठी टायसनने कोटीचं मानधन घेतले होते.
इतके मानधन घेतले
बॉलीवूड हंगामाच्या ताज्या अहवालानुसार, चित्रपटाच्या निर्मात्यांनी माइक टायसनला (Mike Tyson) कॅमिओ भूमिकेसाठी 25 कोटी रुपये दिले होते. ही कल्पना चित्रपटाचे दिग्दर्शक पुरी जगनाद यांची होती. परंतू करण जोहर आणि विजय देवरकोंडा यांना जगनादची ही कल्पना आवडली नाही, पण त्यांनी आपला मुद्दा पटवून दिला आणि पूर्ण केला आहे. या चित्रपटात पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला, मात्र तो काही खास कमाल करू शकला नाही.
दरम्यान 'लायगर' (Liger) फ्लॉप झाल्यामुळे वितरक वारंगल श्रीनू यांचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या दक्षिण आवृत्तीचे वितरण हक्क विकत घेतले होते. तेही 70 कोटींमध्ये. केवळ हिंदीतच नाही तर साऊथमध्ये हा सिनेमा फ्लॉप ठरलाय.