मुंबई : स्टार प्रवाहवरील मालिका ‘आई कुठे काय करते’ सुरुवातीपासून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेतील अभिनेता मिलिंद गवळी (Milind gawali) हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकतंच, त्यांच्या भूमिकेविषयी आणि स्टार प्रवाहच्या गणेशोत्सव कार्यक्रमाविषयी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिलिंद गवळी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मिलिंद कार्यक्रमाआधी पूर्व तयारी करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत 'या गणेश उत्सवाच्या कार्यक्रमाच्या आधीची पूर्वतयारी केल्याशिवाय कुठलंच काम सफल होत नाही. संकल्पनेपासून सुरुवात होते ह्या पूर्वतयारीची, स्टार प्रवाहमधल्या क्रिएटिव्ह माणसाला सुचलेली ही कल्पना, गणेश उत्सवात विघ्नासूरची गोष्ट मांडायची, या विघ्नासूर राक्षसाचा विघ्नेश्वर कसा झाला, ओझरचा विघ्नेश्वर गणपती कसा झाला, असं ते म्हणाले.



पुढे ते म्हणाले, स्टार प्रवाहच्या सगळ्या कार्यक्रमांमधून एक राक्षस शोधायचा, मग तो राक्षस शोधणं सुरू झालं आणि त्यांना तो राक्षस पटकन सापडला. मला फोन आला, मला म्हणाले तुम्ही या रियसल करायला, आणि म्हणाले आपल्याला राक्षसाची रिहर्सल करायची आहे, मी म्हटलं कोण राक्षस?कुठेय राक्षस?, तर ते म्हणाले तुम्हीच आहात की, मी म्हणालो ....मी? , अहो मी नाही ओ राक्षस, ते म्हणाले अहो तुम्हीच आहात..तुम्हीच अनिरुद्र देशमुख आहात ना?तुम्हीच आहात राक्षस, असं मिलिंद म्हणाले. 


पुढे ते म्हणतात, 'मग माझ्या लक्षात आलं, कि त्यांना राक्षस शोधणं किती सोपं झालं होतं. अनिरुद्धपेक्षा दुसरा योग्य राक्षस कोण असेल? तर कोणीच नाही. म्हटल आता आपल्याला राक्षस प्ले play करायचा आहे तर प्रॅक्टिस practice करायलाच हवी. वैभव घुगे आणि त्याची टीम असल्यामुळे आपल्याला फार कठीण जाणार नाही, याची आधीच कल्पना होती. अनिल शिंदेने मेहनत घेतली.आणि, माझ्या शंकाकुशंका दूर करून मला पूर्ण राक्षस बनवला.मग काय राक्षस झालोच आहे म्हटल्यानंतर मग राक्षसासारखा वागायला फार मजा आली.'


विघ्नासुरला देवांनेच निर्माण केलं असल्यामुळे. गणपती बाप्पाने त्याच्या चुका पोटात घालून त्याला आशीर्वाद दिला होता की यापुढे तू विघ्नासूर या नावाने ओळखला जाशील. तर मघ आता जेव्हा गणपती बाप्पा येथील तेव्हा गणपती बाप्पाकडे हाच आशीर्वाद मागायचा की आपल्या आतला जो राक्षस आहे, त्याला दूर करून, जसा विघ्नासूराला विघ्नेश्वर केलंस, तसंच आम्हाला सुद्धा आशीर्वाद दे आणि आम्हा सर्वांचे कल्याण कर. सगळ्या टीमचे खूप खूप आभार.