मिलिंद अंकिता अलिबागमध्ये विवाहबद्ध...
गेल्या काही दिवसांपासून मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिताच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले होते.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिताच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले होते. अंकिता मिलिंदला सोडून गेली अशा खबर सर्वत्र पसरली होती. मात्र या सर्व अफवांवर दोघांनी न बोलता उत्तर दिले. दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन फोटोज शेअर केले. त्यावरुन या दोघांचे सर्व आलबेल असल्याचे प्रेक्षकांच्या लक्षात आले. त्याच दरम्यान हे दोघे अलिबागमध्ये विवाहबद्ध होणार असल्याचे बोलले जात होते. पण आता मात्र या सर्व चर्चांना पू्र्णविराम लागला आहे. कारण ५२ वर्षीय मिलिंद सोमण गर्लफ्रेंड अंकिता कंवरसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
कोण आहे अंकिता ?
अंकिताचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे.
ती २७ वर्षांची आहे.
ती मुळची गुवाहटीची रहिवाशी आहे.
गेल्या दीड वर्षांपासून ती मिलिंदला डेट करत आहे.
या लग्नामुळे दोन्ही कुटुंबिय आनंदात आहेत.
हे मिलिंदचे दुसरे लग्न
लग्न करण्यापूर्वी मिलिंदने अंकिताच्या पालकांची भेट घेतली. त्यानंतर घरच्यांच्या संमतीने त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. आता अंकितासोबत मिलिंद त्याच्या आयुष्याची नवी सुरुवात करणार आहे. हे मिलिंदचे दुसरे लग्न असून यापूर्वी त्याने फ्रेंच अॅक्ट्रेस Mylene Jampanoi सोबत विवाह केला होता. मात्र ३ वर्षातच ते विभक्त झाले.
फोटोज
आता या दोघांचे काही फोटोज समोर आले आहेत. यात अंकिताच्या हातावर मेंहदी लागली पाहायला मिळते. तर दुसऱ्या फोटोत ते आनंदात नाचताना दिसत आहेत.