मिलिंद सोमण आणि अंकिता कुंवर टीव्हीच्या वादग्रस्त शोमध्ये
शोमध्ये सहभागी होण्यासाठी मिलिंदनेही होकार दिलाय.
मुंबई : काही महिन्यांपूर्वीच ५२ वर्षीय मॉडेल आणि अॅक्टर मिलिंद सोमणने २१ वर्षाने लहान असलेल्या गर्लफ्रेंड अंकिता कोनवारशी लग्न केले. मिलिंद आणि अंकिताने अलिबागमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. त्यानंतर हे कपल जगभरातील प्रसिद्धी माध्यमात चांगलेच चर्चेत राहिले. आता हे कपल छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त शो चा हिस्सा होतायंत. या दोघांनाही बिग बॉसच्या घरातून संपर्क केल्याचे कळते. इंग्रजी वेबसाईट आयबीटीने दिलेल्या वृत्तानुसार शो मेकर्सने सीझन १२ साठी मिलिंदशी बोलण केलंय. शोमध्ये सहभागी होण्यासाठी मिलिंदनेही होकार दिलाय.
मिलिंद- अंकिता केमिस्ट्री
दिल्लीत राहणा-या अंकिताने एअर एशिया एअरलाईन्समध्ये केबिन क्रू म्हणून कामाला सुरूवात केली होती. हिंदी, इंग्लिश, फ्रेंच, बंगाली अशा विविध भाषांवर प्रभूत्व असलेली अंकिता मॅरेथॉनदरम्यानच मिलींद सोमणच्या प्रेमात पडली. २०१५ मध्ये अंकिताने मिलींदसोबत मॅरेथॉनचा टप्पाही पूर्ण केला होता.खरंतर मिलींद सोमणचं हे दुसरं लग्न. याआधी जुलै २००६ मध्ये फ्रेंच अॅक्ट्रेस मायलेनशी मिलिंदने लग्नाची गाठ बांधली होती. मात्र ती फार काळ काही टिकली नाही. माजी मिस इंडिया आणि मॉडेल मधू सप्रेसोबतच्या अफेअरमुळेही मिलींद सोमण चर्चेत होता.