मिलिंद-अंकिताचे Barefoot Wedding
पावसाळ्यातील निसर्गसौंदर्यासोबत मिलिंद-अंकिताचे प्रेमही फुललेले दिसत आहे.
मुंबई : पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य सर्वार्थाने खुलते. त्याचबरोबर वातावरणही अतिशय रोमांटिक असते. याच रोमांटिक वातावरणात अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कंवर यांचे प्रेमही अधिकच फुलत आहे. मिलिंद अंकिताने निसर्गसौंदर्याने नटलेल्या स्पेनमध्ये पुन्हा लग्न केले आहे. या लग्नाची खासियत म्हणजे हे barefoot wedding होते. या आगळ्या वेगळ्या लग्नाचे फोटोज अंकिताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. =
पाहा या खास सोहळ्याचे फोटोज...
लग्नात दोघांचाही लूक अत्यंत क्लासी असून त्यांचे हे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अंकिता मिलिंदचे हे ड्रिम वेडिंग असल्याचे तिने फोटो कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
या लग्नसोहळ्याला मिलिंदची आई उषा सोमण आणि इतर नातेवाईक उपस्थित होते.
मिलिंद आणि अंकिता यांचे प्रेम, रिलेशनशीप चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र दोघांनीही ते कधीच त्यांचे रिलेशन लपवून ठेवले नाही. त्यांचे प्रेम त्यांनी लग्न करुन पूर्णत्वास नेले. याचवर्षी २२ एप्रिलला मिलिंद-अंकिता हिंदू पद्धतीने विवाहबद्ध झाले.